![Priyanka-Nick](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F04%2F77777777777777.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि पती निक जोनस रोममध्ये एकमेंकासोबत सुट्यांचा मनमुराद आनंद घेत आहेत. प्रियांका तिच्या आगामी 'सिटाडेल' चित्रपटाच्या प्रमोशनमधून वेळ काढुन निकसोबत एन्जॉय करत आहे. रोममध्ये दोघेजण एकमेंकावर रोमॉन्टिक मूडमध्ये प्रेमाचा वर्षाव करताना स्पॉट झालेत. रोमॉन्टिक होण्याची ही काय त्याची पहिलीच वेळ नाही तर अनेक ठिकाणी दोघांना रोमॉन्टिक होताना पाहिले गेले आहे. याआधी लिफ्टमध्ये Priyanka-Nick रोमॉन्टिक झाले होते. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून चाहत्यांनी 'क्यूट कपल' असे म्हणत त्याच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव केलाय.
प्रियांका चोप्रा सध्या तिच्या अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर 'सिटाडेल' वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. बिझी शेड्युलमधून वेळ काढून प्रियांका निक जोनाससोबत रोमच्या रस्त्यांवर दिमाकात फेरफटका मारताना दिसली आहे. Colosseum च्या समोरून दोघेजण हातात- हात घालून फिरताना दिसले. यावेळी निक आणि प्रियांक ( Priyanka-Nick) रोमॉन्टिक मूडमध्ये येत एकमेंकाना लिपलॉप केले आहे. तर कधी आईस्क्रीमवर ताव मारला आहे.
या व्हिडिओत प्रियांका ग्रे कलरच्या ब्रा, मिनी स्कर्ट आणि जॅकेटमध्ये ग्लॅमरस दिसली. तर यावेळी रेड करलच्या शर्ट आणि पॅन्टमध्ये निक हॅडसम दिसला. दोघांनी व्हाईट कलरचे बूट आणि चष्मा परिधान केला होता. या व्हिडिओला कॅप्शमध्ये निकने 'रोम' असे लिहिले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी दोघांच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव केला.
एका युजर्सने ' क्यूट रिलेशनशिप खूपच स्वीट', तर दुसऱ्या युजर्सने 'दोघांनी एकत्रित चित्रपटात दिसावे' असे म्हटलं आहे. प्रियांका रोममध्ये तिच्या आगामी 'सिटाडेल' या वेबसीरिजचे प्रमोशन करत आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू आणि वरुण धवन यांनी भूमिका साकारल्या आहेत. दिग्दर्शन राज आणि डीके करणार आहेत. प्रियांका आणि निकने १ आणि २ डिसेंबर २०१८ रोजी जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये ख्रिश्चन आणि हिंदू रितीरिवाजांनी लग्न केले होतं.
हेही वाचा :