Prajakta Mali : प्राजक्ता माळीवर मिश्किल कमेंट?; ‘काय प्राजू तू पण.!

Prajakta Mali : प्राजक्ता माळीवर मिश्किल कमेंट?; ‘काय प्राजू तू पण.!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' च्या मंचावर मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी ( Prajakta Mali ) चाहत्यांना खळखळून हसवत असते. मनमोकळ्या आणि मनमिळावू स्वभावासोबत अभिनय कौशल्याने तिने सिनेसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.  प्राजक्ता मराठी अभिनेता अंकुश चौधरीसोबत 'लॉकडाऊन' चित्रपटात दिसली होती. याच दरम्यान सध्या प्राजक्ताचा पिंक कलरचा 'बॉस लेडी' लूक सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळीने ( Prajakta Mali ) गेल्या दोन दिवसांपासून एकाच पिंक रंगाचे काही फोटो तिच्या इंन्स्टाग्रामवर शेअर करत आहे. यात तिने पिंक रंगाचा शूट आणि त्याच रंगाचे पॅन्ट परिधान करून चारचॉद लावले आहेत. यातील विशेष म्हणजे, तिच्या वरच्या शूटचे बलून शोल्डर, हटके कॉलर आणि कमरेवरील पट्टाने चाहत्याचे लक्ष वेधून घेतले आहे. केसांची स्टाईल, कानात मोठ्या गोल हूप इअररिग्स, हातात अंगठी, पायात ब्लॅक रंगाच्या हाय हिल्स , मॅट लिपस्टिक, आयलायनर आणि सिंपल मेकअपने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.

शेअर केलेल्या फोटोंना तिने 'Blessed is the WOMAN, that chases no one. Need no validation. And handles her business like a boss. ?Last from the series.. ' आणि 'Be your own boss And conquer the world… ?,But..from tomorrow ; coz today is a Sunday ?'. असे म्हटलं आहे. प्राजक्ताने या फोटो क्लिक करताना किलर आणि वेगवेगळ्या हटके पोझ दिल्या आहेत. यात तिने कधी कमरेवर तर कधी तिच्या गुडघ्यावर हात ठेवत हटके पोझ दिल्या आहेत. हे फोटो चाहत्याच्या पंसतीस उतरले आहेत.

प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहत्यांसह अनेक मराठी स्टार्सनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. यात एका युजर्सने 'Hii ?? lay chaan', 'Best of look ?', 'Tujhya sarki tuch fakat', 'ये लाल रंग कब मुझे झोडेगा……. ?', 'Beautiful looking',  'Barik jhaalis', 'Stylish ?', 'So cute❤️❤️❤️', 'Beauty in pink ?', 'Gorgeous & Beautiful ❤️✨', 'अलगद हळुवार स्मित हास्य❤️❤️❤️', 'Nice look', 'So sweet?', '???? jabardast slim zali praju Mali ❤️tu punha gulabachya phoolachi kali zali?', 'कडक हाय ???', 'सुदंर, ❤️Wow awesome dear ❤️', 'काय प्राजू तू पण.!?', 'Gulabooo Beauty ?', 'Oh my my… Simply OSM ❤️❤️',यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे. या फोटोला आतापर्यत जवळपास ५५ हजांराहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. याशिवाय प्राजक्ता माळीचे सोशल मीडियावर अनेक हॉट फोटोज पाहायला मिळतात.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news