Nayanthara-Vignesh Anniversary : नयनतारा-विघ्नेशने लग्न ६ वर्षे लपविले; आता केला खुलासा

Nayanthara-Vignesh Anniversary : नयनतारा-विघ्नेशने लग्न ६ वर्षे लपविले; आता केला खुलासा
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री नयनतारा आणि तिचा पती विघ्नेश शिवन हे साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कपल आहे. दोघे आज लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा ( Nayanthara- Vignesh Anniversary ) करत आहेत. नयनतारा -विघ्नेश ९ जून २०२२ मध्ये चेन्नईत धुमधडाक्यात लग्न बंधनात अडकले. मात्र, वाढदिवसानिमित्ताने त्यांनी लग्नाच्या ६ वर्षापूर्वीची नोंद केल्याची माहिती आता समोर आली आहे.

अभिनेत्री नयनतारा आणि विग्नेश शिवन यांची लव्हस्टोरी खूपच हटके आहे. २०१५ मध्ये 'नानुम राऊडी धान' (Naanum Rowdy Dhaan) या चित्रपटादरम्यान दोघांची भेट झाली. यानंतर दोघांनी सहा वर्ष एकमेंकाना डेट केलं आणि त्यानंतर दोघेजण लग्न बंधनात अडकले. लग्नानंतर चार महिन्यात सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांना जन्म दिला. या घटनेचा माहिती विग्नेशने सोशल मीडियावर दिल्यानंतर याबाबत खूपच सोशल मीडियावर चर्चा रंगली.

यादरम्यान या जोडप्याने तामिळनाडूच्या आरोग्य विभागाकडे प्रतिज्ञापत्र सादर केले. यामध्ये त्याने सांगितले की, त्याच्या लग्नाची नोंदणी ६ वर्षांपूर्वीच झाली होती. यानंतर या वाद निवळला. याबाबतची माहिती आज त्याच्या लग्नाच्या पहिल्या ( Nayanthara- Vignesh Anniversary ) वाढदिवशी समोर आली आहे. यावरून दोघांनी ६ वर्ष नाते लपवून ठेवल्याची माहिती मिळतेय.

नयनताराने लग्नात लाल रंगाची साडीसोबत साजेशीर दागिने परिधान केले होते. नववधूच्या वेशभूषेत नयनतारा खूपच सुंदर दिसत होती. तर विघ्नेशने क्रीम रंगाचा धोती कुर्त्यावर त्याच रंगाची शाल परिधान केली होती.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news