Disha Patani : Omg??!; टायगरला आता तरी मराठी मुलगी पसंत आहे काय?…

Disha Patani
Disha Patani

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी ( Disha Patani ) तिच्या फिटनेससोबत अभिनयाची छाप पाडत असते. नेहमीच तिची एक झलक पाहण्यास चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. दिशा सतत बोल्ड आणि हॉट फोटोज शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आता तिचा अणखी एका पारंपरिक लूक समोर आल्याने चाहत्यांना घायाळ केलं आहे.

अभिनेत्री दिशा पटानी ( Disha Patani ) हीने नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर एक पारंपरिक वेशभूषेतील सोज्वळ मुलीसारखा लूक शेअर केला आहे. आपण नेहमीच दिशाला एकापेक्षा एक बोल्ड लूकमध्ये पाहिले आहे. यावेळी मात्र, तिच्या पारंपरिक व्हाईट रंगाचा वनपीस ड्रेसवर चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. दिशाने खास करून या वनपीसवर त्याच रंगाची ओढणी परिधान केली आहे.

दिशाने फोटोसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती घराच्या बागेत असून वनपीसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसतेय, मोकळ्या केसांची स्टाईल, कानात मोठे इअररिंग्स, हातात ब्रेसलेट, मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. दिशाचे हे फोटो शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुक करताना कॉमेन्टसचा पाऊस पाडला आहे. याच दरम्यान एका चाहत्याने दिशाचा बॉयफ्रेंड टायगरची आठवण काढत 'आता तरी मराठी मुलगी पसंत आहे काय?' असा प्रश्न विचारला आहे.

So Sweet … Looking great, Beautiful ❤️, Girl in western is OK but Girl in tradition haaye ?? no one can beat Girl in tradition, Gorgeous, Hayee❤️❤️❤️, Khubsurat Disha ??, Stunning ❤️, So beautiful ??, So Sweet, Your look is creating a beautiful ✨VIBE✨!, Sundar ?, Awwwwww ?????, Woooow superb yar ??, OMG!!!, Prettiest Disha ❤️, Omg ??. यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही युजर्सनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. या फोटोला आतापर्यंत जवळपास ९ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news