Amruta Khanvilkar : पडक्या वाड्याच्या विहिरीपाशी ‘चंद्रा’ काय करतेय?

Amruta Khanvilkar :
Amruta Khanvilkar :

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर 'चंद्रमुखी' चित्रपटातील 'चंद्रा' गाण्याने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. अनेक एकापेक्षा एक गाजलेल्या चित्रपटातील अभियनसोबत तिच्या सौदर्यांची जादू कायम आहे. अस्सल लावणी डान्समुळे चर्चेत असलेली अमृता म्हणजे, चंद्राच्या ( Amruta Khanvilkar ) आणखी काही हॉट फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव करत कॉमेन्टसचा पाऊस पडला आहे.

अभिनेत्री अमृता खानविलकरने ( Amruta Khanvilkar ) नुकतेच तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊटवर काही हॉट फोटोज शेअर केले आहे. यावेळी खास करून अमृताने पडक्या वाड्याच्या विहिरी जवळील दगडी कठड्यावर बसून फोटोशूट केले आहे. या फोटोशूटवेळी अमृता ब्लॅक रंगाच्या ऑफ शोल्डर टॉप आणि डेनिममध्ये एकदम हटके दिसली.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने '#blacklove'. असे लिहिले आहे. हे फोटोशूट तिने खास करून 'व्हॅलेंटाईन डे' च्या निमित्ताने केलं आहे. चंद्राच्या या फोटोतील एकापेक्षा एक हॉट पोझनं चाहत्यांना घायाळ केलं आहे. कुरळ्या मोकळ्या केसांची स्टाईल, कानात इअररिग्स, मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केलाय. हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव करत कॉमेन्सटचा पाऊस पाडला आहे.

'Finelly खुर्ची सुटली ??', 'Black day par black photo', 'Wowww Beauuutifuuul ??', 'फारच सुंदर व छान', 'Cutie+beauty ?, Beutiful ❤️???', 'Beauty ?', 'Wow❤️', 'Be like आई ग अंग दुखतय ?', 'Aai la sangaych na pathila saban lavun dyayla kashala itka vyayam krtay madam', 'looking sooo awesome ??❤️', 'so hottt ????', 'कोई हमे भी पटा लो यार ????????? पर ❤️', 'Heroine ?', 'Hottie ??', 'Happy velentine day…..one more year without you ❤️❤️❤️', 'Sundar ?', 'Hot in black ??', 'Ufffff ??', 'tumhi tar radach kelay??', 'Stunning ❤️❤️', 'So hot ??', 'Super, ???? मादक अमृता', 'कुठे बसून फोटो काढलो विहिरीच्या कट्यावर बसून कळलं का??', 'Lovely pits❤️', यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

तर हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे. या फोटोला तीन तासात १५ हजारांहून अधिक चाहत्यांनी कॉमेन्टस केल्या आहेत. तिच्या पोस्टवर मराठी अभिनेत्री सायली संजीवसह अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अमृता खानविलकर सोशल मीडियावर फोटो शेअर करून सक्रिय असते. ती नेहमीच आपल्या चाहत्यांना आपले अपडेट्स सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news