पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका चाहत्यांच्या घराघरात पोहोचली आहे. या मालिकेतील सर्वच पात्राच्या अभिनयाचे खूपच कौतुक झाले. मात्र, 'दयाबेन' ची भूमिका खूपच गाजली. दयाबेनची भूमिका अभिनेत्री दिशा वकानीने उत्तमरित्या साकारली होती. मात्र, दिशा आई झाल्यानंतर टीव्ही इंडस्ट्रीपासून दुर राहिली आणि आता नवनविन कलाकरांची या भूमिकेसाठी निवड करण्याचे प्रयत्न निर्माते करत आहेत. परंतु, म्हणावे तसे पात्र त्यांना मिळत नाही. याच दरम्यान वेगवेगळ्या अभिनेत्रींनी 'दयाबेन' ची भूमिका साकारली आणि प्रत्येक वेळी चाहत्यांची निराशाच झाली. दरम्यान चाहत्यांनी नव्या 'दयाबेन' आणण्यासाठी मोठी मागणी केली आहे. दुसरीकडे अभिनेत्रींच्या नावाचीही त्यानीच घोषणा केली आहे.
संबंधित बातम्या
छोट्या पडद्यावरील 'गुम है किसी के प्यार में' फेम अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा खूपच चर्चेत आली आहे. या मालिकेनंतर, ऐश्वर्याने 'खतरों के खिलाडी' आणि 'बिग बॉस १७' असे बॅक टू बॅक हिट शो केलं. काही दिवसापूर्वी ऐश्वर्या आणि पती नील भट्ट हे बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या रिअॅलिटी शो 'बिग बॉस १७' मधून बाहेर पडले. या शोमधून बाहेर आल्यानंतर ऐश्वर्याने तिचा पती नील भट्टसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत ती वेगवेगळ्या स्टाइलमध्ये मिमिक्री करताना दिसली होती. दरम्यान सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला आणि काही नेटकऱ्यांकडून ऐश्वर्याला ट्रोल देखील केले गेलं.
दुसरीकडे काही चाहत्यांनी तिच्या मिमिक्रीचे भरभरून कौतुकही केलं. दरम्यान ऐश्वर्याच्या मिमिक्री टॅलेंटची प्रशंसा करताना चाहत्यांनी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत अभिनेता दिलीप जोशीसोबत 'दयाबेन'ची भूमिका करण्याची मागणी केली. एका सोशल मीडियावरील युजर्सने 'ऐश्वर्या हुबेहुब दयाबेनसारखे बोलू शकते', 'ती दया बनू शकते.' यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. मात्र, सोशल मीडियावर जरी याबद्दलची चर्चा पसरली असली तरी खरोखरंच अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा 'दयाबेन'ची भूमिका साकारणार आहे की नाही? याची अधिकृत्त माहिती अद्याप मिळालेली नाही.
'गुम है किसी के प्यार में' या मालिकेतून ऐश्वर्या शर्माला खरी लोकप्रियता मिळाली. या मालिकेत ऐश्वर्याने 'पाखी' ची नकारात्मक भूमिका साकारली होती. यानंतर ऐश्वर्या नील भट्टसोबत लग्न केलं. दोघांच्या लग्नाला आता दोन वर्षे झाली आहेत. (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)