Parineeti Chopra : लग्नाच्या दोन महिन्यानंतर परिणीती- राघव हनीमूनला; म्हणाली, ‘मी आयुष्यभर…’

Parineeti Chopra
Parineeti Chopra
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ( Parineeti Chopra ) आणि नेता राघव चड्डा दोघांनी गेल्या २४ सप्टेंबर २०२३ रोजी लग्न बंधनात अडकले. यानंतर काहीच दिवसांत क्यूट कपल दोघेजण आपआपल्या कामात बिझी झाले. आता दोन महिन्यानंतर आणि ख्रिसमसच्या मुहुर्तावर परिणीती आणि राघव हनीमूनला लंडनला गेले आहेत. लंडनमधील फिरण्याचे आणि मौजमस्ती करतानाचे फोटो परिणीतीने शेअर केले आहे.

संबंधित बातम्या 

नुकतेच परिणीती ( Parineeti Chopra ) आणि राघवने आपल्या कामातून ब्रेक घेत लंडनमध्ये यंदाच्या ख्रिसमस साजरा करण्यासाठी आणि एकमेंकासोबत टाईन्स स्पेंड करण्यासाठी गेले आहेत. शेअर केलेल्या फोटोत परिणीणीने ख्रिसमस ट्री, गिफ्ट, वेगवेगळे खाण्याचा पदार्थ, घरात केलेली सजावट दिसतेय. याशिवाय लंडनमध्ये रोमॉन्टिक मूडमध्ये राघवसोबत फिरतानाही ती स्पॉट झाली आहे. दरम्यान परिणीतीने तिचा लग्नानंतरचा पहिला हनीमून साजरा केला आहे. याशिवाय एका फोटोत परिणीतीने तिच्या खोलीच्या खिडकीबाहेरचे सुंदर दृश्य दाखविले आहे.

हे फोटो परिणीतीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलं आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'मी आयुष्यभर माझ्या सांताच्या प्रेमात पडत आहे…' असे लिहिले आहेत. दरम्यान परिणीतीचे चाहते हे फोटो पाहून भरभरून दोघांवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरचे ईमोजीदेखील शेअर केले आहेत. परिणीती आणि राघव चड्डा दोघांनी गेल्या २४ सप्टेंबर २०२३ रोजी राजस्थानमध्ये शाही पद्धतीने लग्न केलं आहे. लग्नानंतर काहीच दिवसांत परिणीती आणि राघव आपआपल्या कामात व्यस्त झाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by @parineetichopra

 

View this post on Instagram

 

A post shared by @parineetichopra

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news