Salaar Trailer : सुलतानाला जे हवे असेल…; प्रभासच्या ‘सालार’ चा दुसरा ट्रेलर रिलीज (video)

Salaar Trailer
Salaar Trailer

पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदाच्या ख्रिसमसच्या निमित्ताने म्हणजे, २२ डिसेंबर रोजी साऊथ स्टार प्रभासचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सालार' प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानच्या 'डंकी' चित्रपटाला टक्कर देणार आहे. आता 'सालार' चित्रपटाचा दुसरा ट्रेलर ( Salaar Trailer) निर्मात्यांनी रिलीज केला आहे. याआधी चित्रपटाचा हलकासा ट्रेलर प्रभासच्या इन्स्टाग्रामवर पाहायला मिळाला होता. या चित्रपटात प्रभासला अॅक्शन अवतारात पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. देशातच नाही तर परदेशातही या चित्रपटाची प्रचंड क्रेझ आहे.

संबंधित बातम्या 

दोन मिनिट ५३ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये साऊथ अभिनेता प्रभासचे दर्जेदार अॅक्शन सीन पाहायला मिळत आहे. सुरूवातीला ट्रेलरमध्ये खिळे ठोकणारा आणि कुस्तीपटूशी लढताना एक छोट्या मुलगा दाखविला आहे. यानंतर सुलतान आणि त्याचे साम्राज्य, प्रभासचे अॅक्शन सीन, जाळपोळ, डोजर यासारख्या अनेक गोष्टी यात दाखविल्या आहेत. याशिवाय शेवटी प्रभास बुंदूक चालवताना आणि अभिनेता पृथ्वीराज सुकुमार, श्रुती हासन आणि जगपती बाबू यांचीही झलक पाहायला मिळाली आहे.

याच दरम्यान ट्रेलरमध्ये ( Salaar Trailer) "सुलतानला कितीही त्रास झाला तरी तो आपले रहस्य सैन्याला न सांगता, फक्त एका व्यक्तीला सांगत असतो. सुलतानाला जे हवे असेल ते तो व्यक्ती त्याच्याकडे नेवून देत असे आणि त्यांची इच्छा नसल्यास कोणतीच गोष्ट मिळत नसे." असे डॉयलॉग यावेळी म्हटले गेलं आहेत. हा व्हिडिओ होम्बले फिल्मच्या युटयूबवर पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी भरभरून प्रभासचे कौतुक केलं आहे.

याआधी 'सालार' चित्रपटातील पहिला ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरूवात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत पहिल्याच दिवशी चार कोटींहून अधिक कमाई केली आहे. शिवाय हा चित्रपट शाहरूख खानच्या 'डंकी'ला टक्कर देणार आहे. हा चित्रपट चार दिवसानंतर म्हणजे, २२ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hombale Films (@hombalefilms)

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news