औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर कारवाई होणार: अंबादास दानवेंच्या मागणीवर सरकारची ग्वाही

File Photo
File Photo

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगरमध्ये काही लोकांकडून नामांतराच्या मुद्द्यावरून औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी विशेष बाब अंतर्गत मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज (दि.८) केली. तर औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर कारवाई होणार, अशी ग्वाही दानवे यांच्या मागणीवर सरकारकडून देण्यात आली.

तसेच आंदोलनकर्त्यांकडून कोणतीही वेळ न पाळता रात्री १२ वाजेपर्यंत घोषणाबाजी करून वेळेच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. याकडे दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. यावर सरकारकडून उत्तर देताना सांगण्यात आले की, या आक्षेपार्ह बाबीची शासनाकडून गंभीर दखल घेतली जाईल. आजच गृहमंत्री यांच्याशी चर्चा करून त्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले.

तसेच औरंगजेबाचे समर्थीकरण व उदात्तीकरण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करून याबाबत तपास करण्यात यावा, असे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news