विमानाच्या मागे दिसणार्‍या पांढर्‍या रेषा कशाच्या असतात?

विमानाच्या मागे दिसणार्‍या पांढर्‍या रेषा कशाच्या असतात?

लंडन ः आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडत असतात, ज्या आपण अतिशय सामान्य मानतो आणि त्यामागचं कारण शोधण्याचा प्रयत्नही करत नाही, पण या सामान्य दिसणार्‍या गोष्टींमागे भुवया उंचावणारे कारण असू शकते. यातील एका गोष्टीबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अनेकदा आकाशाकडे पाहिल्यानंतर तुम्हाला विमान उडताना दिसते. यावेळी तुम्हाला विमानाच्या मागे आकाशात एक किंवा दोन पांढर्‍या रंगाची रेष पाहिली असेल. लहानपणापासून आपण विमानाच्या मागे दिसणारी ही रेष धूर समजत आलो आहे, पण हा मोठा गैरसमज आहे.

आकाशात विमानाच्या मागे दिसणारी पांढरी रेष ही धूर असल्याचा तुमच्या आमच्या अनेकांचा समज आहे. तुम्हालाही असेच वाटत असेल, तर हा तुमचा गैरसमज आहे. अमेरिकन अंतराळ संस्था 'नासा'च्या रिपोर्टनुसार, विमानाच्या मागे दिसणार्‍या पांढर्‍या रंगाच्या रेषांना कंट्रेल्स म्हणतात. कंट्रेल्स म्हणजे एक प्रकारचे ढग असतात, पण कंट्रेल्स सामान्य ढगांपेक्षा वेगळे असतात. हे ढग फक्त विमान किंवा रॉकेटमुळेच तयार होतात.

नासाच्या अहवालानुसार, जेव्हा विमान पृथ्वीपासून 8 किलोमीटर अंतरावर आणि -40 डिग्री सेल्सिअस तापमानात उडत असते, तेव्हाच हे ढग तयार होतात, ज्यांना कंट्रेल्स असे म्हटले जाते. रॉकेट किंवा विमानांच्या एग्जॉस्टमधून एरोसॉल्स बाहेर पडतात. एरोसॉल्स म्हणजे हवेतील द्रव बिंदू आणि इतर वायूचे सूक्ष्म कण. हवामानातील आर्द्रतेमुळे या एरोसॉल्सचे रुपांतर ढगात होते, यालाच कंट्रेल्स म्हटले जाते. विमान किंवा रॉकेट काही अंतरापर्यंत गेल्यावर हे कंट्रेल्स गायब होतात, हे तुमच्या निदर्शनास आले असेल. यामागचे कारण म्हणजे हवेमधील आर्द्रतेमुळे हे कंट्रेल्स तयार होतात. आकाशातील जोरदार वार्‍यामुळे कंट्रेल्सही त्यांच्या जागेवरून सरकतात आणि गायब होतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news