Accident : नांदेडमधील महंत त्यागीनंद महाराजांसह दोघांचा भीषण अपघातात मृत्यू, दोघे जखमी

Accident : नांदेडमधील महंत त्यागीनंद महाराजांसह दोघांचा भीषण अपघातात मृत्यू, दोघे जखमी

नांदेड; पुढारी वृत्तसेवा : नांदेड तालुक्यातील पुणेगाव येथील परमानंद कुटिया मंदिराचे महंत निष्काम योगी त्यागीनंद महाराज आणि पुणेगाव येथील काही भाविक उत्तराखंड, उत्तर प्रदेशमध्ये दर्शनासाठी जात होते. त्यांच्या कारला मध्य प्रदेशमधील कटनी येथे भीषण अपघात झाला. हा अपघात शुक्रवार (दि.११) रोजी सकाळी सातच्या सुमारास झाला. घटनेची माहिती पुणेगाव येथे कळताच अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आहे. (Accident)

दर्शनासाठी जाणाऱ्यामध्ये महंत त्यागीनंद महाराज (वय ५२), बळीराम विक्रम पूयड (वय ४८), दत्ता नागोराव पूयड, बालाजी जाधव माळकवठेकर, रामचंद्र पांचाळ, माधव पांचाळ, रतनकुमार आणि कारचालक संभाजी बालाजी जाधव यांचा समावेश आहे.

Accident : आज रात्री महाराजांचा मृतदेह पुणेगावात आणणार

या भीषण अपघातात महंत त्यागीनंद महाराज आणि बळीराम पूयड यांचा जागीच मृत्यू झाला. तर रतनकुमार किरकोळ जखमी झाला आहे. अपघात झालेल्या कारचा क्रमांक (एमएच २६ एके ७१३३) असा असून कारचालक संभाजी जाधव किरकोळ जखमी झाला आहे. उत्तरीय तपासणीनंतर दोन्ही मृतदेह आज रात्री उशिरापर्यंत पुणेगाव येथे आणण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news