JNU : डाव्या संघटनांनी शिवरायांचा अवमान केल्‍याचा अभाविपचा आरोप; जेएनयूमध्ये वातावरण तापले

जेएनयू
जेएनयू
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्‍तसेवा  शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमावेळी शिवरायांचा फोटोचा अवमान केल्‍याचा गंभीर आरोप जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील डाव्या संघटनांवर झाला. या प्रकरणामुळे जेएनयूमधले वातावरण तप्त झाले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जेएनयूमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शिवरायांचा अवमान केल्याचा आरोप आहे. दुसरीकडे डाव्या संघटनांनी हे आरोप फेटाळले आहेत. दर्शन सोळंकी नावाच्या विद्यार्थ्याने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्याचा निषेध म्हणून काढण्यात आलेल्या कँडल मार्चनंतर अभाविपने होस्टेलवर हल्ला केल्याचा प्रतिआरोप डाव्यांच्या जेएनयूएसयू संघटनेने केला आहे.

जेएनयूमध्ये झालेल्या राडेबाजीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमेचा अवमान झाल्‍याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. दरम्यान झटापटीत पाच ते सहा कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती अभाविपचे पदाधिकारी कुमार आशुतोष यांनी दिली आहे. शिवरायांचा अवमान करणाऱ्या डाव्या संघटनांवर जेएनयू प्रशासन तसेच दिल्ली पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news