पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूर – गगनबावडा रस्त्यावर दोनवडे (ता. करवीर) येथे आज (दि.३०) दुपारी झाड कोसळले. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. गोवा, पणजी, गगनबावडा, तळेरे, तसेच तळ कोकणात जाणारी वाहतूक तब्बल अर्ध्या तासाहून अधिक काळ ठप्प झाली.
कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे दोनवडे येथे वडाचे भले मोठे झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली. दुपारी सव्वा तीनच्या सुमारास हे झाड पडले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सव्वाशे वर्षापेक्षा जुने हे झाड आहे. वाहतूक साबळेवाडी-खुपिरे व दोनवडे-वाकरे मार्गे सुरू आहे. झाड तोडण्याचे व बाजूला करण्याचे काम सुरू झाले नाही. भले मोठे झाड असल्याने तोडण्यासाठी वेळ लागणार आहे.