मुंबई : घाटकोपरमधील मार्केटला आग, 25 दुकाने भक्ष्यस्थानी

file photo
file photo

घाटकोपर ः पुढारी वृत्तसेवा ;  घाटकोपर पश्चिमेकडील खोत गल्ली येथील सागर बोनान्झा मार्केट परिसरात रात्री अचानक आग लागली. त्यात तब्बल 25 दुकाने भक्ष्यस्थानी पडली असून, एकजण जखमी झाला आहे. तर जवळपास 25 ते 30 जणांना पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यु केले आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगितले जात असून, तब्बल सहा तासांनी ती आटोक्यात आणल्याची माहिती देण्यात आली आहे. रात्री साडे अकराच्या सुमारास ही आग लागली असून, या आगीची तीव्रता जास्त होती अशी माहिती देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या 

या आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे ही आग आजूबाजूला असणार्‍या दुकानांना लागली. त्यात 25 ते 30 दुकाने जळून खाक झाली आहेत. या दुकानांमध्ये शूज, झेरॉक्स मशीन, फोटो फ्रेम, मोबाईल क्सेसरीज, कपडे तसेच विविध वस्तू होत्या. आगीमुळे त्या वस्तूंचे नुकसान झाले आहे. ही माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न करत अखेर 6 तासानंतर जवानांना त्यात यश आहे.

या आगीत एक दुकान मालक संतोष सावंत यांना गंभीर दुखापत झाली आहे असून, त्यांना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरुवातीला भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या भागात रोज रात्रीपर्यंत नागरिकांची वर्दळ असते. मात्र यावेळी हा परिसर तसा निर्जन शांत होता, लोकांची जास्त वर्दळ नव्हती. त्यामुळे जीवितहानी टळली आहे. मात्र मार्केटमधील 20 ते 25 दुकानांचा जळून खक झाली आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news