Agra News : बकऱ्याच्या चित्राचा केक कापून बकरी ईद साजरी; आग्र्यातील मुस्लिम कुटुंबाचा प्राणी हत्या न करण्याचा संदेश

Agra News : बकऱ्याच्या चित्राचा केक कापून बकरी ईद साजरी; आग्र्यातील मुस्लिम कुटुंबाचा प्राणी हत्या न करण्याचा संदेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : आग्रा  (Agra News) येथे गुरुवारी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुस्लिम समाजातील लोकांनी किंमती बकऱ्यांची कुर्बानी दिली. पण, या शहरात एक कुटुंबाने अनोख्या पद्धतीने बकरी ईद साजरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले . वास्तविक, हे कुटुंब स्वत: कधीही कोणत्याही प्राण्याचा बळी देत नाही. त्याचप्रमाणे बलिदानाच्या नावाखाली इतरांनाही प्राण्यांचा बळी न देण्यास प्रेरित करत असतात. या कुटुंबाने बकरीचे चित्र असलेला केक कापून बकरी ईद साजरी केली. अशा प्रकारे केक कापून बकरी ईद साजरी करून बळी न देण्याचा संदेश दिला.

तिरंगा मंझील, आझमपारा, शेरवानी मार्ग, शहागंज परिसरात राहणारे (Agra News) नवाबगुल चमन शेरवानी यांचे कुटुंब गेल्या सहा वर्षांपासून बकरी ईदला बकरीचे चित्र असलेला केक कापून कुर्बानी दिल्याचे मानतात. अशा प्रकारे सण साजरा करून संपूर्ण कुटुंब समाधान मानतात.

दरम्यान, वंदे मातरम आणि तिरंगा प्रेम या राष्ट्रीय गाण्यांमुळे चमन शेरवानी पहिल्यांदा प्रकाशझोतात आले होते. चमन शेरवानी हे फतेहपूर सिक्री लोकसभा मतदारसंघातून वंचित समाज इंसाफ पार्टीचे माजी खासदार आहेत. चमन शेरवानीच्या कुटुंबाचा असा विश्वास आहे की, देवाने खाण्यासाठी सर्व काही निर्माण केले आहे. मग कोणत्याही सजीवाचा खाण्यासाठी बळी देणे योग्य नाही. फार कमी लोक शरियत पद्धतीने कुर्बानी करतात. तर काही लोक सणासुदीच्या नावावर श्रीमंती दाखवून गरिबांच्या गरिबीची चेष्टा करतात, असे त्यांचे मत आहे.

विधी म्हणून आपण ज्या प्राण्याशी आसक्ती करतो. त्या प्राण्याचा बळी द्यावा. लहानपणापासूनच आम्ही त्यांना आमच्या कुटुंबातील सदस्य म्हणून वाढवले ​​आहे. जर आपण असे केले. तर आपल्याला त्या प्राण्याचे मांस खाण्याची इच्छा होऊ शकत नाही, असे चमन शेरवानीचे मत आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news