गोवा; पुढारी वृत्तसेवा : दूधसागर धबधब्याजवळील बोगद्यानजीक रेल्वे रुळावर दरड कोसळली आहे. या दुर्घटनेनंतर निजामुद्दीन एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस थांबवण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत रुळावरील दरड बाजुला करण्याचे काम सुरू होते. यामुळे रेल्वे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली असून रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून गतीने काम पूर्ण करत आहेत.
रविवार सुट्टीचा दिवस असल्याने येथे पहाटेच दोन हजारपेक्षा अधिक पर्यटक दाखल झाले आहेत. मात्र तिथे रेल्वे पोलिसांनी या पर्यटकांना दूधसागर धबधब्यावर जाण्यापासून अडवले व बंदी असल्याने माघारी जाण्याची सूचना केली. त्यावेळी हे पर्यटक रेल्वे रूळावर थांबले होते. यावेळी धबधबा पर्यटकांसाठी खुला करण्याची मागणी पर्यटकांनी पोलिस व वनखात्याच्या अधिकार्यांकडे केली. आता रेल्वे रुळावरच दरड कोसळल्याने गोव्याला जाणाऱ्या रेल्वे गाड्या थांबवण्यात आल्या आहेत.