प्रणिती शिंदे यांना महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठी जबाबदारी | पुढारी

प्रणिती शिंदे यांना महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठी जबाबदारी

मुबंई, पुढारी ऑनलाईन : मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळण्याची चिन्हे असलेल्या सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांची काँग्रेसच्या प्रवक्तेपदी निवड झाली. महाराष्ट्र काँग्रेस कार्याकारिणीने याबाबत ट्विटवर माहिती दिली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाच्या प्रवक्तेपदाच्या निवडी जाहीर केल्या. त्यात शिंदे यांच्याही नावाचा समावेश आहे. या नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी गुरुवारी रोजी काढले. हिवाळी अधिवेशनाआधी महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार होईल असे बोलले जात होते. मात्र, ती शक्यता मावळली आहे. आता काँग्रेस आक्रमक पावित्र्यात असून पक्षबळकटीसाठी प्रयत्न सुरू आहेत. माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांची मुलगी आणि काँग्रेसमधील युवा चेहरा म्हणून प्रणिती शिंदे यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी घेतलेली भाजपविरोधी भूमिका आणि राज्यातील विषयांची केलेली मांडणी यामुळे त्यांना ही संधी मिळाल्याचे बोलले जातआहे.

आयएमआयएमच्या विरोधात प्रणिती यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. पटोले यांनी जाहीर केलेल्या प्रवक्त्यांच्या नव्या यादीत भावना जैन, गोपाल तिवारी, निजामुद्दीन राईन, सुधीर ढोणे, चारुलता टोकस, हेमलता पाटील, दिलीप एडतकर, भरत सुरेश सिंह यांचा समावेश आहे. कपिल ढोके, बालाजी गाडे आणि शमीना शेख यांना मीडिया पॅनलिस्ट म्हणून जबाबदारी दिली आहे.

हेही वाचा : 

Back to top button