आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | बुधवार, १९ जून २०२४

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य

[author title="चिराग दारूवाला :" image="http://"][/author]

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष : अतिविचार कामाच्या क्षमतेवर परिणाम करू शकतो

श्रीगणेश सांगतात की, तुम्ही काही काळासाठी स्थलांतरित होण्याचा विचार करत असाल किंवा एखाद्या मालमत्तेवर काम करण्यापूर्वी पुनर्विचार करत असाल.तर यश मिळेल. मुलांकडूनही चांगली बातमी आल्यास घरातील वातावरण आनंदी राहिल. अतिविचारामुळे होणारा ताण तुमच्या कामाच्या क्षमतेवर परिणाम करू शकतो. काही महत्त्वाची कामेही हाताबाहेर जाऊ शकतात. याची काळजी घ्या. भावांसोबतचे संबंध मधुर होतील.

वृषभ : वैयक्तिक बाबी कोणाकडेही उघड करू नका

श्रीगणेश म्हणतात की, आज तुमच्या वैयक्तिक बाबी कोणाकडेही उघड करू नका. घर नूतनीकरण आणि देखभाल संबंधित कामांमध्ये खर्च वाढू शकतो. तुमचे मासिक बजेट बिघडणार नाही याची काळजी घ्‍या. निर्यात-आयाती संबंधित व्यवसायात यश मिळेल. मुलाच्या करिअर संदर्भात चांगली बातमी मिळाल्याने घरात आनंदाचे वातावरण राहील.

मिथुन : नातेवाइकांच्या सहकार्याने प्रगतीचा मार्ग मोकळा

श्रीगणेश सांगतात की, आज ग्रहमानाची साथ लाभेल. राजकीय फायदा झाल्‍याने समाजात सन्मान वाढेल. उत्पन्नातही वाढ होऊ शकते. नातेवाइकांचे सहकार्य प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. तुमच्‍या राजकीय वर्तनाचा चुकीचा फायदा कोणीतरी उचलू शकतो, याची जाणीव ठेवा. यंत्राशी संबंधित व्यवहार आज अनुकूल स्थिती असेल. तुमच्या यशामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण असेल.

कर्क: नोकरीत पदोन्नती मिळू शकते

आज एखादा महत्त्वाचा प्रवास पूर्ण होऊ शकतो. काही वेळ मनोरंजनात व्‍यतित केल्‍याने मन प्रसन्न राहील. कोणत्याही कामात व्यस्त राहणे टाळा, अन्यथा वाद होऊ शकतात. बाहेरच्या व्यक्तीच्या सल्‍ल्‍यापेक्षा तुमचा निर्णय सर्वोपरि ठेवा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. नोकरीत पदोन्नती मिळू शकते. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा राहील.

सिंह:  मुलांच्या अभ्यासावर लक्ष द्या

श्रीगणेश सांगतात की, आज घरामध्ये डागडुजी करत असाल तर वास्तुच्या नियमांचे पालन करणे तुमच्‍यासाठी फायदेशीर आणि भाग्यवान ठरेल. मुलांच्या अभ्यासावर लक्ष द्या. खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसायाशी संबंधित केलेल्या योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. पती-पत्नीमध्ये लहानसहान गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात.

कन्या: दुपारीनंतर परिस्थिती तुमच्या अनुकूल आहे

आज दुपारीनंतर परिस्थिती तुमच्या अनुकूल आहे. प्रलंबित कामे मार्गी लागतील, असे श्रीगणेश सांगतात. नवीन कपडे आणि दागिने खरेदीची योजना असेल. कोणतेही काम करण्यापूर्वी सर्व पातळ्यांवर काळजीपूर्वक नियोजन करा. चुकीच्या कारणांमुळे अधिकारी तुमच्यावर निराश होऊ शकतात.

तूळ : तुमच्या मेहनतीने तुमचे ध्येय साध्य करू शकता

आज तुम्ही तुमच्या मेहनतीने तुमचे ध्येय साध्य करू शकता. घरामध्ये बदलाची योजना असेल. एखाद्या ठिकाणाहून दु:खद बातमी मिळू शकते ज्यामुळे मन उदास राहील. त्याचा तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होईल. कार्यक्षेत्रात तुमच्या सध्याच्या घडामोडींवर लक्ष केंद्रित करा, असे श्रीगणेश सांगता. कुटुंबातील कोणत्याही मोठ्या व्यक्तीसोबत आरोग्याशी संबंधित समस्या असू शकतात.

वृश्चिक : गुंतवणुकीशी संबंधित लाभदायक काळ आहे

आर्थिक गुंतवणुकीशी संबंधित लाभदायक काळ आहे. यासंदर्भातील योजनांवर आज लक्ष केंद्रित करा, असे श्रीगणेश सांगतात. आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात वेळ जाईल. आपल्या वैयक्तिक कर्तव्यांमध्ये घरातील ज्येष्ठांच्या सेवेकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घ्‍या. हट्टी स्वभावावर नियंत्रण ठेवा.

धनु : उत्पन्न आणि खर्च समान असेल

श्रीगणेश म्‍हणतात की, आज अध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात वेळ व्‍यतित केल्‍याने मनःशांती लाभेल. उत्पन्न आणि खर्च समान असेल. स्थलांतराचे नियोजन असेल तर ती कामे आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. अतिविचारामुळे कामात अडचणी येतात. तुमची अतिरिक्‍त शिस्त पाळणे इतरांसाठी समस्या निर्माण करू शकते.

मकर: महत्त्वाच्या व्यक्तीशी झालेली भेटही फायदेशीर ठरेल

आज एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी झालेली भेटही फायदेशीर ठरेल. मुलांच्‍या यशामुळे सुखावाल. भावांसोबत गोड संबंध ठेवा, आर्थिक क्रियाकलापांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असे श्रीगणेश सांगतात.

कुंभ: तरुणांना त्‍यांच्‍या करीअर संदर्भात चांगली बातमी मिळेल

आज नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्‍या कामांमध्‍ये तुम्हाला यश मिळेल. तरुणांना त्‍यांच्‍या करीअर संदर्भात चांगली बातमी मिळेल. जास्त विचार करणे आणि वेळ गुंतवणे यामुळे तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. लोकांना भेटताना शिष्टाचार जपा, अशी सूचना श्रीगणेश करतात. कोणत्याही प्रकारच्या व्यवसायात भागीदारासोबत पारदर्शक रहा. प्रेमसंबंधात गोडवा राहील.

मीन: वैवाहिक जीवनात गोडवा राहील

श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही तुमचे काम योग्य पद्धतीने करून तुमचे ध्येय सहज गाठू शकाल. एखादा नातेवाईक तुमच्या मागे तुमच्याबद्दल अफवा पसरवू शकतो. आर्थिक बाबतीत सावध राहा. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. तणाव आणि वातावरणातील बदलामुळे आरोग्‍याच्‍या समस्‍या जाणवतील.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news