चामुंडी स्फोटातील शेवटच्या जखमीचाही मृत्यू, मृत्यूसंख्या ९

चामुंडी स्फोट
चामुंडी स्फोट

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा अमरावती रोडवरील हिंगणा तालुक्यातील मौजा तुरागुंदी येथील चामुंडी एक्सप्लोसिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या स्फोटके बनविणाऱ्या कंपनीत १३ जून रोजी स्‍फोट झाला. स्फोटातील शेवटच्या जखमी तरुणाचाही आज (रविवार) अखेर मृत्यू झाला. गन पावडर अँड सेफ्टी फ्युज सेक्शनमध्ये स्फोट झाल्यामुळे पाच महिला आणि एक पुरुष अशा एकूण सहा व्यक्तींचा मृत्यू घटनेच्या दिवशीच झाला होता.

शुक्रवार, शनिवारी आणि आज रविवारी आणखी तीन व्यक्तींचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतकांची संख्या 9 झाली आहे. प्रमोद चवारे (वय २५ वर्ष) रा. नेरी मानकर तालुका हिंगणा यांच्यावर रविनगर येथील दंदे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आज प्रमोदचाही जीवन जगण्याचा संघर्ष संपला, अशाप्रकारे या रुग्णालयात दाखल तिघांचाही मृत्यू झाला. एकेक कामगारांच्या मृत्यूची बातमी आल्याने कंपनी विरोधात परिसरातील जनतेत असंतोष असून कडक पोलीस बंदोबस्त कायम आहे.

कंपनीचे मालक, संचालक आणि व्यवस्थापक यांना इतरांच्या मृत्यूस दोषी ठरवित पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी त्यांना लगेच जामीनही मिळाल्याने जनमानसात संताप आहे. ढिसाळ व्यवस्थापन, कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी न घेणे, घटना घडल्यानंतर मृतकांच्या नातेवाईकांना पैसे दिले की संपले या अविर्भावात व्यवस्थापन वागत असल्याचा, हप्ते घेत असल्याने संबंधित मंत्री, प्रशासन कारवाई करीत नसल्याचा आरोप यापूर्वीच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. यापूर्वी अमरावती रोडवरीलच सोलर कंपनीत भीषण स्फोटाची घटना घडली होती.

चामुंडा एक्सप्लोसिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटामध्ये एकंदर 9 कामगार गंभीर जखमी झाले होते. दानसा मरसकोल्हे यांचा शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. दानसा मूळ मध्यप्रदेश येथील असून त्यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सोपवित मध्यप्रदेशकडे रवाना करण्यात आला. श्रद्धा पाटील यांचे शनिवारी उपचारादरम्यान निधन झाले. वारसांना कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने रुपये 25 लाख रकमेचा धनादेश देण्यात आला. पोस्टमार्टमसाठी मृतदेह मेडिकलला रवाना करण्यात आला. या स्फोटात प्रांजली मोदरे (वय 22 वर्ष) रा. धामणा तालुका नागपूर ग्रामीण, प्राची फलके (वय २० वर्षे) रा. धामणा तालुका नागपूर ग्रामीण, वैशाली क्षीरसागर (वय २०वर्ष) रा. धामणा तालुका नागपूर ग्रामीण, मोनाली अलोने (वय 27 वर्ष) रा. धामणा तालुका नागपूर ग्रामीण, पन्नालाल बंदेवार (वय ५० वर्ष) रा. सातनवरी तालुका नागपूर ग्रामीण, शीतल चरप (वय ३० वर्ष) रा. धामणा तालुका नागपूर ग्रामीण असे 9 जण गंभीर जखमी झाले होते. या सर्वांचाच मृत्यू झाला.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news