आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | रविवार, १६ जून २०२४ | पुढारी

आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | रविवार, १६ जून २०२४

आजचे राशिभविष्य

चिराग दारूवाला : चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष: नोकरी व्यावसायिकांना बदलीशी संबंधित चांगली बातमी मिळेल

श्रीगणेश सांगतात की, आज ग्रहमान अनुकूल आहे. सामाजिक कार्यात सहभागी व्‍हाल. ध्येय साध्‍य कराल. कोणत्याही प्रकारची समस्या शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. मुलांकडे दुर्लक्ष करु नका. व्यावसायिक कामे व्यवस्थितपणे पूर्ण होतील. भागीदारीसाठी वेळ अनुकूल आहे. नोकरी व्यावसायिकांना बदलीशी संबंधित काही चांगली बातमी मिळेल.

वृषभ : वाहन चालवताना काळजी घ्या

आज महत्त्वाच्या व्यक्तींसोबतची भेट फायदेशीर ठरेल. कुटुंब आणि व्यवसाय दोन्हीमध्ये योग्य सामंजस्य राहील. मालमत्तेशी संबंधित एखादे प्रलंबित प्रकरण असल्यास ते दुरुस्त केले जाईल. व्यवसायात कोणतीही कागदोपत्री काम करताना सावधगिरी बाळगा. तणाव न घेता शांततेने प्रश्न सोडवा. धोकादायक कृती टाळा. वाहन चालवताना काळजी घ्या, अशी सूचना श्रीगणेश करतात.

मिथुन : आज प्रलंबित कामे पूर्ण होतील

श्रीगणेश म्‍हणतात की, आज प्रलंबित कामे पूर्ण होतील. वैयक्तिक कामांवर लक्ष केंद्रित करू शकाल. कुटुंबातील सदस्‍यांचे सहकार्यही मिळेल. प्रतिकूल परिस्थितीला घाबरण्याऐवजी त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. तणावाखाली असलेल्या व्यक्तीशी वाद घालू नका. योग्य व्यवस्थापनामुळे कामाच्या ठिकाणी योग्य सुव्यवस्था आणि कर्मचाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

कर्क : कामाचा दर्जा सुधारणे आवश्यक आहे

श्रीगणेश सांगतात की, आज परिस्‍थिती अनुकूल असेल. अध्यात्मिक वातावरण लाभल्‍याने मनःशांतीसह सकारात्मक ऊर्जा मिळेल.आत्मकेंद्रितपणामुळे जवळच्या नातेवाईकांसोबत कटुता निर्माण होऊ शकते. व्यवसायात काही अडथळे येतील. कामाचा दर्जा सुधारणे आवश्यक आहे.

सिंह: कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्‍या

आज तुमचा दिवस शांततेत जाईल. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्‍या. आर्थिक स्थिती तुमच्या अनुकूल राहील. नात्यातील गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील, असे श्रीगणेश सांगतात. वैयक्तिक कामात जास्त लक्ष द्या. मनातील स्वस्थता आणि नकारात्मक विचारांमुळे चीडचीड वाढेल. घरातील ज्‍येष्‍ठांकडे दुर्लक्ष करू नका, यामुळे वातावरण बिघडू शकते.

कन्या : आर्थिक गुंतवणुकीसाठी विचारपूर्वक निर्णय फायदेशीर

आर्थिक गुंतवणुकीबाबत विचारपूर्वक घेतलेला निर्णय भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. कौटुंबिक मनोरंजन कार्यक्रमाचे नियोजन असेल. अतिश्रमामुळे चिडचिडेपणा वाढेल परिस्‍थिती संयमाने हाताळा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. वैयक्तिक व्यस्ततेमुळे कामात जास्त वेळ घालवू नका. कोणत्‍याही नवीन कामासाठी योग्य वेळेची वाट पाहणे आवश्यक आहे, अशी सूचना श्रीगणेश करतात.

तूळ: अतिआत्मविश्वासामुळेही समस्या उद्भवू शकतात

काही काळापासून केलेल्या मेहनतीचे अनुकूल फळ मिळेल. लाभाचे नवे मार्गही खुले होतील. जवळच्या नातेवाईकाच्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाला जाण्याचीही संधी मिळेल. अतिआत्मविश्वासामुळेही समस्या उद्भवू शकतात. तुमच्या योजना यशस्वी करण्यासाठी कठोर परिश्रम करा. मुलांना योग्य मार्गदर्शन करणं खूप गरजेचं आहे, असे श्रीगणेश सांगतात.

वृश्चिक : उत्पन्नाचा थांबलेला स्रोत पुन्हा सुरू करता येईल

अनेक कार्यक्रमांमध्ये तुमची उपस्थिती कायम राहील. तरुणांना करिअरशी संबंधित विशेष माहितीमुळे दिलासा मिळेल. भावासोबत मतभेदाची शक्‍यता. संयमाने नातेसंबंध जपा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. उत्पन्नाचा थांबलेला स्रोत व्यवसायात पुन्हा सुरू करता येईल.

धनु : पैशाच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवणे योग्य नाही

काही काळापासून सुरू असलेली समस्या नातेवाईक आणि कुटुंबीयांच्या मदतीने दूर होईल, असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबातील वडीलधारी मंडळी आणि ज्येष्ठांसोबत थोडा वेळ घालवा. जवळच्या मित्राशी नाते बिघडवण्यासारखी परिस्थिती उद्भवू देऊ नका. पैशाच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवणे योग्य होणार नाही. कौटुंबिक वातावरण आनंददायी आणि शांततापूर्ण राहील.

मकर : विद्यार्थी व युवकांनी आपल्या कामाप्रती गाफील राहू नये

आज कौटुंबिक वाद तुम्ही तुमच्या युक्तीने सोडवू शकाल. परस्पर संबंध पुन्हा मधुर होतील, असे श्रीगणेश सांगतात. एखाद्या अज्ञात व्यक्तीकडून तुमचे नुकसान होऊ शकते. यावेळी विद्यार्थी व युवकांनी आपल्या कामाप्रती गाफील राहू नये. व्यवसाय क्षेत्रात आपली उपस्थिती अनिवार्य करा. भागीदारीशी संबंधित कार्यात लाभदायक परिस्थिती निर्माण होत आहे. पाहुण्यांच्या आगमनामुळे घरात उत्सवाचे वातावरण राहील.

कुंभ : तरुणांनी त्यांच्या भविष्याचे नियोजन करावे

रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी तुमचे सुरू असलेले प्रयत्न यशस्वी होतील. तरुणांनी त्यांच्या भविष्याचे नियोजन करावे.जुन्या वादामुळे परिस्थिती तणावपूर्ण राहील. नाराज होण्यापेक्षा शांततेने तोडगा काढा. व्यवसायात काळजी घ्यावी. सहकाऱ्याची नकारात्मक वृत्ती तुम्हाला अडचणीत आणू शकते, असे श्रीगणेश सांगतात.

मीन: तुम्ही तुमच्या वक्तृत्वाने सर्व अडथळे दूर कराल

श्रीगणेश म्‍हणतात की, तुम्ही तुमच्या वक्तृत्वाने सर्व अडथळे दूर कराल. सर्व काही नियोजित रीतीने केल्याने आणि तुमच्या कामात समर्पित राहिल्याने तुम्हाला यश मिळेल. घरात पाहुण्यांच्‍या आगमनामुळे वेळ आनंदात जाईल. खर्च वाढल्याने बचत करणे कठीण होईल. रागावर नियंत्रण ठेवा अन्‍यथा त्‍याचा परिणाम नातेसंबंधावर होईल.

Back to top button