

गौतम बचुटे/केज (बीड) : केज-कळंब रोडवर साळेगाव हद्दीत एक कार रस्त्याच्या कडेला जावून वीज वाहक खांबाला धडकली. कारची धडक जोराची असल्याने लोखंडी खांब पडला. मात्र आतील चालक आणि प्रवाशांना कोणतीही इजा झालेली नाही.
या बाबतची माहिती अशी की, ८ जून रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या दरम्यान प्रचंड वारे आणि पाऊस सुरू असताना केजकडून कळंबकडे जात असलेली कार क्र. (एम एच -०३/ सी एच -०८२८) या गाडीच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे वाहन रस्त्याच्या कडेला गेले आणि वीज वाहक खांबाला धडकले. हा अपघात एवढा भयानक होता की या धडकेने एक लोखंडी खांब उखडून पडला, तर दुसरा वाकलेला आहे. मात्र सुदैवाने या खांबावरील वीज पुरवठा बंद होता. या अपघातात गाडीचे जरी नुकसान झालेले असले तरी आतील प्रवाशी व चालक मात्र पूर्णतः सुरक्षित असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.
हेही वाचा :