Lok sabha Election 2024 Result : हिंगोलीत ठाकरे गटाचे आष्टीकर विजयाच्या उंबरठ्यावर

ठाकरे गटाचे आष्टीकर विजयाच्या उंबरठ्यावर
ठाकरे गटाचे आष्टीकर विजयाच्या उंबरठ्यावर
Published on
Updated on

हिंगोली : पुढारी वृत्‍तसेवा हिंगोली लोकसभा मतदार संघातून बाराव्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर यांनी तब्बल 2 लाख 41 हजार 71 मते घेत महायुतीचे बाबुराव पाटील कोहळीकर यांच्यावर 52 हजार 52 मतांची आघाडी घेतली आहे. कोहळीकर यांना 12 व्या फेरीअखेर 1 लाख 91 हजार 19 मते मिळाली तर वंचितचे डॉ. बी.डी. चव्हाण यांना 84 हजार 955 मते मिळाली. प्रशासनाकडून 12 फेर्‍यांची अधिकृत माहिती देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात मात्र 20 फेर्‍यांची मतमोजणी पुर्ण झाली आहे. ठाकरे गटाचे आष्टीकर हे एक लाखापेक्षा अधिक मतांनी आघाडीवर असल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर तसेच हिंगोली शहरात गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतषबाजी सुरू केली आहे. सायंकाळी सहा नंतर अंतिम निकाल हाती येणार असला तरी आष्टीकर यांनी विजयाचा गुलाल उधळल्यात जमा आहे.

गेला बाबुराव आले नागेशराव

हिंगोली लोकसभा मतदार संघात प्रचाराच्या दरम्यान महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्यासाठी शांता गेली, शालू गेली, आता कुणाच नाव, आला बाबुराव, आला बाबुराव या गाण्याची थिम गाजली होती. प्रचारसभेत असो की कॉर्नर बैठकीत आला बाबुरावचाच बोलबाला होता. परंतू मंगळवारी झालेल्या मतमोजणीत महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाल्याने मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांना गेला बाबुराव, आले नागेशराव अशी आठवण करून देत टोले हाणले.

गद्दारी करणार्‍यांना पुन्हा गुलाल नसल्याचा मतदार संघाचा इतिहास

हिंगोली लोकसभा मतदार संघातून शिवसेनेकडून ज्यांनी-ज्यांनी आतापर्यंत पक्षाशी गद्दारी केली त्यांना पुन्हा कधीच विजयाचा गुलाल नशिबी आला नाही. मावळते खासदार हेमंत पाटील यांनी शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांची उमेदवारी शिंदे गटानेही कापली. त्यांच्या जागी अत्यंत नवखे असलेले बाबुराव कदम कोहळीकर यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली तर ठाकरे गटाकडून माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. दोन्ही शिवसेनेत लढत झाली. कदम यांचा इतिहास पाहता त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत हदगाव विधानसभा मतदार संघातून शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी करून निवडणुक लढविली होती. त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून नशिब आजमाविले. परंतू मतदारांनी त्यांना पराभूत करत गद्दारांना क्षमा नसल्याचे दाखवून दिले.

आष्टीकर यांचा परिचय

नाव:- नागेश बापूरावजी पाटील आष्टीकर
(शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जिल्हाप्रमुख नांदेड)
जन्म तारीख:- 27 जुलै 1972
शिक्षण:- एम.कॉम.
ज्ञात भाषा:- मराठी, हिंदी, इंग्रजी
पत्नी:- सौ सुषमा नागेश पाटील आष्टीकर
मुलगा:- कृष्णा नागेश पाटील आष्टीकर
सून:- सौ वैष्णवी कृष्णा पाटिल आष्टीकर
मुलगी:- सौ पूजा श्रीकांत तरोडेकर
संपूर्ण पत्ता:- ह.मु.पोस्ट हदगाव ता. हदगाव जिल्हा नांदेड
पक्ष :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
भूषविलेली पदे:- माजी आमदार हदगाव विधानसभा मतदारसंघ 2014 ते 2019
माजी सरपंच:- मौजे आष्टी ग्रामपंचायत (2000-2005)
माजी सभापती:- कृषी उत्पन्न बाजार समिती हदगाव (2005-2013)
माजी संचालक:- पुणे पणंन महासंघ (2002 ते 2007)
माजी सदस्य :- मराठवाडा विद्यापीठ (1995-2000)
माजी तालुका प्रमुख:- शिवसेना हदगाव 2010-2014
संचालक नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक नांदेड 2016 पासून
माजी सदस्य :- मुख्यमंत्री ग्राम सडक योजना
माजी सदस्य:- अनुसूचित जाती जमाती समिती
विदेश दौरे :- अमेरिका, कॅनडा, बँकॉक, युरोप, इस्‍त्रायल, दुबई असे एकूण 17 देश

हेही वाचा ; 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news