Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | सोमवार २७ मे २०२४ | पुढारी

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | सोमवार २७ मे २०२४

चिराग दारूवाला :  

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejanआजचे राशिभविष्यdaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष: तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल

गणेश म्हणतात की, आजचा दिवस कठोर परिश्रम आहे. तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद तुमच्यासाठी महत्त्‍वपूर्ण ठरेल. कुटुंबाच्या कल्याणासाठी तुमचे योगदान राहिल. मात्र मनात नकळत निराशेची स्थिती येऊ शकते. जवळचे मित्र किंवा नातेवाईकांसोबत गैरसमज निर्माण होण्‍याची शक्‍यता. मुलांकडे दुर्लक्ष करू नका. व्यापारात कामाचा किंवा उत्पादनाचा दर्जा राखा. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. आरोग्‍य चांगले राहिल.

वृषभ : कर्ज घेवून व्यापार करू नका

श्रीगणेश सांगतात की, आर्थिक गुंतवणुकीचा विचार करा. चिंतनात थोडा वेळ व्‍यतित करा. कर्ज घेवून व्यापार करू नका. घराबाहेरील गोष्‍टींमध्‍ये निष्‍कारण वेळ वाया वेळ घालवू नका, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. कोणत्‍याही गोष्‍टींच्‍या नियोजनबरोबरच प्रत्‍यक्ष कृती करणे महत्त्‍वपूर्ण राहिल. पती-पत्नीचे नाते आनंदी राहील. खाण्‍यावर नियंत्रण ठेवा असंतुलित खाल्ल्याने पोटविकार होवू शकतो.

मिथुन : व्यवसायात कार्यप्रणाली बदलण्याची गरज आहे

आज व्यक्तिमत्त्व सुधारणाकडे तुमचा कल असेल. कुटुंब आणि जवळच्या नातेवाईकांसोबत संबंध सुधारण्‍यासाठी थोडा वेळ व्‍यतित कराल. मात्र अशावेळी कोणाशीही मतभेद होणार नाहीत, याची काळजी घ्‍या, अशी सूचना श्रीगणेश करतात. व्यवसायात कार्यप्रणाली बदलण्याची गरज आहे. पती-पत्नीमध्ये चांगले सामंजस्य राहील.

कर्क : इतरांवर अवलंबून न राहता स्वतःच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवा

श्रीगणेश म्हणतात की, आज इतरांवर अवलंबून न राहता स्वतःच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवा. योग्‍य कर्माचे फळही योग्य मिळते. त्‍यामुळे तुमची वाटचाल योग्य दिशेने सुरु ठेवा. अति-चर्चेमुळे यश हातातून निसटू शकते, याची जाणीव ठेवा. अहंकारावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. स्नायू दुखण्‍यचाी समास्‍या जाणवेल.

सिंह: बाहेरच्या व्यक्तीशी किंवा शेजाऱ्याशी वाद टाळा

श्रीगणेश सांगतात की, कुटुंबाला शिस्‍तबद्‍ध ठेवण्‍यासाठी आज तुम्ही महत्त्वाचे नियम कराल. घरातील व्यक्तीच्या लग्नाशी संबंधित मंगल कार्याची योजना असेल. बाहेरच्या व्यक्तीशी किंवा शेजाऱ्याशी वाद टाळा. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. संततीचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमचे सहकार्य आवश्यक आहे. कौटुंबिक व्यवस्थेमुळे तुम्ही व्यवसायात जास्त लक्ष देऊ शकणार नाही. कोणत्याही प्रकारच्‍या दुखापतीपासून जपा.

कन्या : शुभचिंतकाकडून आशीर्वाद लाभतील

आज सामाजिक आणि राजकीय कार्यात व्‍यस्‍त राहल. शुभचिंतकाकडून आशीर्वाद लाभतील. कोणाशीही संवाद साधताना शब्दांकडे विशेष लक्ष द्या. तुमचे काही नकारात्मक शब्द इतरांना दुखवू शकतात. यामुळे नातेसंबंध बिघडू शकतात. तुमची कोणतीही महत्त्वाचे गुपित इतरांसमोर उघड करू नका. रिअल इस्टेट व्यवसायात मोठे व्यवहार होण्याची शक्यता आहे. वातावरण बदलाचा आरोग्‍यावर परिणाम होईल.

तूळ : कोणताही विवेकपूर्ण निर्णय भविष्यात फायदेशीर ठरू शकतो

श्रीगणेश म्हणतात की, आज स्वतःच्‍या कामांवर लक्ष केंद्रीत करा. आज तुम्‍ही घेतलेला कोणताही विवेकपूर्ण निर्णय भविष्यात फायदेशीर ठरू शकतो. अधिक विचार करून तुमची कामे पुन्हा सुरू करा. अहंकार टाळा. मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी हातभार लावा. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वेळ महत्त्वाचा आहे. जोडीदाराच्या तब्येतीची चिंता जाणवेल.

वृश्चिक : जास्त कामामुळे तणाव आणि थकवा जाणवेल

श्रीगणेश म्हणतात की, कौटुंबिक वाद मध्यस्थीने सोडवल्‍यास तुमचे नाते पुन्हा मधुर होईल. मुलांच्या अभ्यास आणि करिअर संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णयांबाबत चर्चा होईल. अचानक काही खर्च समोर येतील. सध्या आर्थिक तणाव असू शकतो. धीर धरा. कार्यक्षेत्रात अनावश्यक काही आव्हाने असू शकतात. कामात सुरू असलेल्या आळसाचा परिणाम कौटुंबिक जीवनावर होईल. जास्त कामामुळे तणाव आणि थकवा जाणवेल.

धनु: विद्यार्थी आणि तरुणांनी ध्येयावर लक्ष केंद्रित करावे

ग्रहस्‍थिती अनुकूल आहे. तुमची प्रतिभा आणि कार्यक्षमतेचा वापर करण्‍याची योग्य संधी मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिकदृष्ट्या जवळच्या कोणाशीही वाद घालू नका. विद्यार्थी आणि तरुणांनी ध्येयावर लक्ष केंद्रित करावे. तुमच्या मेहनतीमुळे आणि व्यवसायातील परिश्रम यामुळे योग्य फळ मिळेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहिल. आरोग्य उत्तम राहू शकते.

मकर: तुमच्या महत्त्वाच्या योजना सुरू करण्यासाठी आजची वेळ योग्य

तुमच्या महत्त्वाच्या योजना सुरू करण्यासाठी आजची वेळ योग्य असल्याचे श्रीगणेश सांगतात. ग्रहमान अनुकूल आहे. तुमच्या क्षमता आणि उर्जेचा पुरेपूर वापर करा. समाजसेवी संस्थांना मदत करण्यातही काही वेळ जाईल. वाहन किंवा घरासाठी कर्ज घेण्यबाबत विचारपूर्वक निर्णय घ्‍या. आर्थिक व्‍यवहारात सावधानता बाळगा. घरातील वातावरण आनंददायी राहील. जास्त कामामुळे थकवा येऊ शकतो.

कुंभ : मीडिया आणि ऑनलाइन कामांशी संबंधित व्यवसायात फायदा होईल

श्रीगणेश म्‍हणतात की, तुमची कार्यक्षमता आणि योग्यता ओळखा. वेळ तुमच्यासाठी चांगली आहे. घरामध्ये आणि समाजात विशेष कामगिरीसाठी तुमचा सन्मान होईल. तुमची प्रगती पाहून काही लोकांमध्ये मत्सर निर्माण होऊ शकतो. तुम्ही या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष कराल. मीडिया आणि ऑनलाइन कामांशी संबंधित व्यवसायात फायदा होईल. पती-पत्नीमध्ये मधुर संबंध निर्माण होतील. पोटदुखीचा त्रास होण्‍याची शक्‍यता.

मीन : आज दैनंदिन जीवनाव्यतिरिक्त तुमच्या छंदासाठीही वेळ काढा

श्रीगणेश सांगतात की, आज दैनंदिन जीवनाव्यतिरिक्त तुमच्या छंदासाठीही वेळ काढा. त्यामुळे तुम्हाला उर्जेने परिपूर्ण वाटेल. घरातील कामातही तुमचा सहभाग असेल. निष्काळजीपणापेक्षा काम टाळलेलेच बरे. मित्राच्या घरी जमल्यास वाद होऊ शकतात. व्यवसायातील कामे सध्या मंद असू शकतात. कौटुंबिक वातावरण आनंदी राहू शकते. सांधेदुखीच्या तक्रारी जाणवतील.

Back to top button