नागपूर : बांबुच्या बुथपासून मेट्रोच्या थीमपर्यंत 10 लक्षवेधी मतदान केंद्र

लक्षवेधी मतदान केंद्र
लक्षवेधी मतदान केंद्र
Published on
Updated on

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी आज (शुक्रवार) मतदान होत आहे. मतदानाचा टक्का वाढावा, नागरिकांना मतदानाचा नावीन्यपूर्ण अनुभव घेता यावा यासाठी विविध प्रकारचे थिम मतदान बुथ तयार करण्यात आले आहेत.

जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. महिला, युवा आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र मतदान केंद्रांची निर्मीती करण्यात आलेली आहे. यासोबतच जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या उत्कृष्ट थिम असणारे मतदान केंद्र मतदारांचे लक्ष वेधून घेत आहेत.

अशी आहेत 10 लक्षवेधी केंद्रे

बांबू थिम मतदान केंद्र : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कक्ष क्र. १ कट्टा, ता. रामटेक, वन (Forest) थिम मतदान केंद्र : नागपूर विद्यापीठ, मानवशास्त्र विभाग कक्ष क्र. ८. उत्तर पश्चिम नागपूर, वस्रोद्योग (Textile) थिम मतदान केंद्रः सरस्वती विद्यालय, बूथ क्र. ३१६, पश्चिम नागपूर, आदिवासी प्रेरित पर्यावरणपूरक सहयोगी मतदान केंद्र:- चारगाव, कुवारा भीमसेन, पारशिवनी, सैन्य प्रेरित मतदान केंद्र : मतदान बूथ क्र. ५१, सेंट जोसेफ हिंदी प्राथमिक शाळा कक्ष क्र. ३, कामठी, तृतियपंथीयांसाठी विशेषत्वाने तयार करण्यात आलेले इंद्रधनुष थिम मतदान केंद्रः- दादा रामचंद्र बाखरू सिंधु महाविद्यालय पाचपावली कक्ष क्र. १, नागपूर (नवीन मंगलवारी), कृषी थिम मतदान केंद्र : मतदान बूथ क्र. २६६ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गोधनी, ता. उमरेड, क्रीडा थिम मतदान केंद्र : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडा संकुल, नागपूर, पर्यावरण थिम मतदान केंद्रः- गोकुल बालवाडी बूथ क्र. १६२, नागपूर पश्चिम, मेट्रो थिम मतदान केंद्र : हडस हायस्कूल, इन्स्टीटयूट ऑफ इंजिनीयर्स मेट्रो स्टेशनच्या जवळ अशी ही 10 नावीन्यपूर्ण मतदान केंद्रे आहेत. सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news