Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | गुरुवार, १८ एप्रिल २०२४ | पुढारी

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | गुरुवार, १८ एप्रिल २०२४

चिराग दारूवाला :

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष: श्रीगणेश म्हणतात की, आज मनात समाधानाची भावना राहिल. भविष्‍यातील नियोजनासाठी करा. संशयी स्‍वभावामुळे नातेसंबंध खराब होऊ शकतात. विचारात लवचिकता ठेवणे फायदेशीर ठरेल. कोणत्‍याही गोष्टींनी भारावून जाऊ नका. मुलांना त्यांच्या अडचणीत मदत करा. सध्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करा. आज अडचणीत जीवनसाथीचा सल्ला तुमच्‍यासाठी फायदेशीर ठरेल.

वृषभ : आज दुपारनंतरची परिस्थिती अनुकूल राहील, असे श्रीगणेश सांगतात. दिवसाच्या सुरुवातीलाच कामांची रूपरेषा तयार करा. कौटुंबिक आणि सामाजिक कार्यात तुमचा वेळ चांगला जाईल. मनात ऊर्जा आणि आनंद राहील. नातेवाईकाशी मतभेदाची शक्‍यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. अडचणीच्या वेळी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. व्यवसायासंबंधी काही अडचणी आल्यास ज्येष्ठांसह अनुभवी लोकांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल.

मिथुन : आज सामाजिक कार्यातही तुमचे विशेष योगदान असेल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक वाद किंवा मतभेद हाताळण्यासाठी योग्य वेळ आहे. निकवटवर्तींयांकडून काही अप्रिय बातम्या मिळणे निराशाजनक ठरु शकते. या काळात आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा, अशी सूचना श्रीगणेश करतात. आज कोणतीही नवीन योजना सुरू करू नका. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वेळ फारसा सोयीचा नाही. बाह्य हस्तक्षेपामुळे कुटुंबातील वातावरण तणावपूर्ण होईल.

कर्क : श्रीगणेश सांगतात की, आज जुन्या मित्राच्या भेटीमुळे तुमचा उत्साह वाढेल. मनोरंजनात वेळ व्‍यतित कराल. मदतीसाठी इतरांवर विसंबून राहण्याऐवजी स्वतःच्या कामाच्या नैतिकतेवर आणि कार्यक्षमतेवर अवलंबून रहा. घरातील ज्येष्ठांचा आदर राखण्याची जबाबदारी तुमची आहे. विद्यार्थी आणि तरुणांनी आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम केले पाहिजेत.पैसे उधार घेऊ नका. व्यवसाय-संबंधित क्रियाकलापांवर त्वरित निर्णय घेण्याचा प्रयत्न करा. घरातील वातावरण आनंदी राहिल.

सिंह : आजचा दिवस सामान्य असेल. मुलांशी संबंधित कोणत्याही समस्येवर उपाय शोधल्यास आराम मिळेल. वडिलधाऱ्यांच्या मदतीने वादग्रस्त मालमत्तेचे निराकरण करण्याचा प्रयत्न करा, असे श्रीगणेश सांगतात. तुमच्यावर पडणारी नवीन जबाबदारी चिंतेचे कारण ठरेल.
गुंतवणूक करण्यापूर्वी नीट विचार करा. कोणाशीही वाद घालू नका. सध्या कोणतेही महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेणे अनुकूल नाही.

कन्या : श्रीगणेश म्हणतात की, आज बहुतांश कामे व्‍यवस्‍थित सुरु राहतील. यामुळे मनाला समाधान मिळेल. कौटुंबिक सुख-सुविधांच्या खरेदीवर खर्च जास्त होईल. कुटुंबाच्या सुखात खर्च होणार नाही. या काळात पैशाचे व्यवहार किंवा कर्ज घेण्याच्या कामांपासून दूर राहा. संवाद साधताना कठोर शब्‍दांचा वापर करु नका. अन्‍यथा वाद होण्‍याची शक्‍यता. सध्या निर्णय घेण्यात काही अडचणी येवू शकतात. व्यवसायातील कामांची गती थोडी मंद असेल.

तूळ : श्रीगणेश म्हणतात की, तुमचा संयम आणि चिकाटी दिनचर्या व्यवस्थित ठेवण्‍यास तुम्‍हाला मदत करेल. मुलांच्या प्रवेशासंबंधी अडचण दूर होण्‍याची शक्‍यता. धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात थोडा वेळ व्‍यतित केल्‍याने मनःशांती मिळेल. आळसामुळे काम टाळण्याकडे कल असेल; पण कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला निर्णय घेण्यात अडचण येत असेल तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. सध्याच्या व्यवसायाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कुटुंबासोबतही थोडा वेळ घालवा. आरोग्य चांगले राहिल.

वृश्चिक : तुमची एखादी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा आजचा दिवस आहे. कोणतेही सरकारी काम रखडले असेल तर त्याकडे लक्ष द्या. भावनिक होऊन चुकीचा निर्णय घेऊ नका. तुमचे विचार व्यावहारिक ठेवा. मीडिया आणि मार्केटिंगशी संबंधित व्यवसायात योग्य यश मिळू शकते. पती-पत्‍नीचे नाते मधूर होईल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थोडे कमजोर वाटू शकते.

धनु : श्रीगणेश सांगतात की, आज अतिरिक्‍त कामाचा भार असेल; पण मनाप्रमाणे यश मिळाल्‍याने उत्साहही वाटेल. तणाव कमी झाल्‍याने महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेता येतील. काहीवेळा सध्याच्या वातावरणामुळे आत्मविश्वास कमी होऊ शकतो. सकारात्मकता आणि स्वारस्य असलेल्या क्रियाकलापांमध्ये थोडा वेळ घालवण्याचे सुनिश्चित करा. आळस टाळा. दुसऱ्या व्यक्तीला तुमच्या कामात ढवळाढवळ करू देऊ नका.

मकर : आज कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कुटुंबातील सदस्य किंवा जवळच्या व्यक्तीचा सल्ला घ्या. यामुळे तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग उघडू शकतो. वाहन किंवा घराशी संबंधित कोणतीही वस्तू खरेदी करण्याचे नियोजन टाळणे चांगले. अचानक मोठा खर्च होऊ शकतो. हट्टीपणामुळे तुमच्या नात्यात दुरावा वाढू शकतो हे लक्षात ठेवा. कोणत्याही फोन कॉलकडे दुर्लक्ष करू नका, अशी सूचना श्रीगणेश करतात.

कुंभ : श्रीगणेश म्हणतात की, आज आव्हानांचा स्वीकार करा, तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. घरातील कोणतीही समस्या सोडवण्यासाठी योग्य वेळ. मत्सरी लोक तुमच्यासाठी त्रासदायक ठरतील. त्‍यांच्‍यापासून सावध राहा.तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. इतरांचा सल्ला चुकीचा ठरू शकतो. अपेक्षित यश न मिळाल्‍याने विद्यार्थी निराश होतील. आर्थिक गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्‍या.

मीन : श्रीगणेश म्‍हणतात की, आज एखादी चांगली बातमी मिळाल्याने मन प्रसन्न राहील. तुमच्या मागील काही क्रियाकलापांमधून धडे घेऊन तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत एक छोटासा सकारात्मक बदल कराल. तरुणांनाही त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू शकते. बाहेरील कोणीतरी तुम्हाला दुखावण्याचा प्रयत्न करू शकेल. बांधवांसोबत चांगले संबंध राखण्यासाठी तुमचे योगदान आवश्यक आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये योग्य समन्वय राहील.

Back to top button