Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | मंगळवार, ९ एप्रिल २०२४ | पुढारी

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | मंगळवार, ९ एप्रिल २०२४

चिराग दारूवाला :


चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष: आज ग्रहमान तुमच्‍यासाठी अनुकूल आहे. संततीच्या भविष्यासाठी थोडी लाभदायक योजना फलद्रूप होईल. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढेल. सामाजिक कार्यात व्यस्तता वाढेल, असे श्रीगणेश सांगतात घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. नवीन काम सुरू होईल. पती-पत्नीमध्ये चांगला संवाद साधता येईल. वाहन सावधगिरीने चालवा.

वृषभ : श्रीगणेश म्‍हणतात की, आज तुमची इच्छा पूर्ण होतील. नवीन कामांचे नियोजन कराल. यासाठी काहींचे सहकार्य मिळेल. आत्मनिरीक्षणाद्वारे आपलं व्यक्तिमत्व सुधारण्याचा प्रयत्न करा. विमा आणि कमिशन संबंधित कामात अधिक यश मिळेल. पती-पत्नीमध्‍ये थोडा वाद होऊ शकतो. खोकला आणि तापाचा त्रास होऊ शकतो.

मिथुन : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला ताणतणाव आज दूर होऊ शकतो, असे श्रीगणेश सांगतात. कोणतेही महत्त्वाचे काम करण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. मुलाच्या करिअर संदर्भात कोणतीही माहिती मिळाल्याने घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. आज कुठेही पैसे गुंतवू नका. कुटुंबातील सदस्यांची एकमेकांप्रती सहकार्याची आणि समर्पणाची भावना घरातील वातावरण आनंदी ठेवेल. नकारात्मक विचार टाळा.

कर्क : आर्थिकदृष्‍ट्या हा काळ उत्तम असल्याचे श्रीगणेश सांगतात. तुम्ही तुमच्या विचार आणि बुद्धीने प्रत्येक समस्येवर उपाय शोधू शकाल. संत किंवा गुरूच्या सहवासात राहिल्याने मनःशांती लाभेल. आज तुमच्या क्षेत्रात काम करण्याचा उत्साह आणि आवेश कमालीचा असेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राखाल. काही काळापासून सुरू असलेल्या आरोग्याच्या समस्यांमध्ये सुधारणा होऊ शकते.

सिंह : श्रीगणेश म्‍हणतात की, आज नातेवाईक आणि शेजारी यांच्याशी संबंध सुधारतील. तुम्हाला मनःशांती मिळेल. राग आणि हट्टीपणामुळे नुकसान होवू शकते, याची जाणीव ठेवा. उत्पन्नाच्या स्त्रोतामध्ये थोडा दोष असू शकतो. पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतो. वातावरण बदलामुळे सौम्य ताप असू शकतो.

कन्या : आज काही महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. आर्थिक परिस्थिती देखील मजबूत असू शकते. तुमच्या ध्येयासाठी पूर्णपणे समर्पित व्हा. यावेळी चुकीच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. पती-पत्नी प्रतिकूल परिस्थितीत एकमेकांना सहकार्य करतील. काही काळापासून सुरू असलेल्या आरोग्याशी संबंधित समस्येपासून तुम्हाला आराम मिळू शकतो.

तूळ: श्रीगणेश म्‍हणतात की, आज थोडा वेळ आत्मचिंतन आणि एकांतात घालवण्याचा प्रयत्न करा. दैनंदिन त्रासातून सुटका मिळू शकते. कुटुंबाच्या गरजांकडे दुर्लक्ष करू नका. त्यांची काळजी घेणे ही तुमची सर्वात महत्वाची जबाबदारी आहे. व्यापारात परिस्थिती सामान्य राहील. घरात आनंदी आणि शांततापूर्ण वातावरण राहिल. थंड पदार्थांमुळे घसा दुखीचा त्रास होवू शकतो.

वृश्चिक : आज तुमच्या आर्थिक योजनेशी संबंधित कामांकडे अधिक लक्ष द्या. भविष्यासाठी ते खूप फायदेशीर ठरू शकते. घराच्या देखभालीच्या कामात योग्य वेळ घालवता येईल, असे श्रीगणेश सांगतात. आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा. व्यवसायाच्या ठिकाणी आपली उपस्थिती आवश्यक असू शकते. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. तणाव टाळा.

धनु: श्रीगणेश म्हणतात की,आज सकारात्मक लोकांसोबत वेळ घालवल्याने तुम्हाला भावनिकदृष्ट्या सशक्त वाटेल.
आपल्‍या विवेकबुद्धीने सर्व समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात अपेक्षित परिणाम मिळू शकतो. पती-पत्नीचे नाते मधुर होऊ शकते. कामाचा अतिरिक्‍त ताण घेवू नका.

मकर : आज कोणत्याही प्रकारच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे, म्हणून प्रयत्न करत रहा. गेल्या काही वर्षांपासून तुम्ही नियोजित केलेली उद्दिष्टे साध्य करण्याची हीच वेळ आहे, असे श्रीगणेश सांगतात. आर्थिकदृष्ट्या थोडी अडचण येऊ शकते. एखाद्याशी संपर्क प्रस्थापित करताना काळजी घेणे आवश्यक आहे. कुटुंबासोबत वेळ व्‍यतित कराल. आरोग्य चांगले राहू शकते.

कुंभ: आर्थिकदृष्‍ट्या आजचा दिवस उत्तम असल्याचे श्रीगणेश सांगतात. कोणाशीही जास्त वादात पडू नका. यामुळे तुमची बदनामी होवू शकते. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. आपण त्‍या हाताळण्यास सक्षम असाल. व्यवसायातील सर्व कामे नीटपणे पार पडतील. जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य तुमचे मनोबल टिकवून ठेवेल. गॅसची समस्या असू शकते.

मीन: श्रीगणेश म्हणतात की, आज अडथळे असूनही महत्त्वाची कामे तुम्‍ही पूर्ण करू शकाल. तुमच्या सभोवतालच्या सकारात्मक लोकांसोबत थोडा वेळ घालवल्याने तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप आराम वाटेल. आज कार्यक्षेत्रात काही अडथळे येऊ शकतात. जोडीदारामधील गैरसमज बाहेरच्या व्यक्तीमुळे होऊ शकतात. खोकला, ताप यासारख्या समस्या जाणवू शकतात.

Back to top button