सावधान! बीडच्या तरुणासोबतचे फेसबुकवरील चॅटिंग महिलेला पडले महाग! राहत्या घरातच… | पुढारी

सावधान! बीडच्या तरुणासोबतचे फेसबुकवरील चॅटिंग महिलेला पडले महाग! राहत्या घरातच...

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा : फेसबुकवरची मैत्री आपल्याला कधीही अंगलट येऊ शकते. विशेषतः फेसबुक वापरणाऱ्या महिलांनी याबाबतीत काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. फेसबुकवरून मैत्री करून अनेक जण महिलांना आपल्या जाळ्यात ओढतात व त्यानंतर जे घडते ते अंगावर काटे आणणारे असते. असाच काहीसा प्रकार एका गृहिणी सोबत घडला आहे. संबंधित महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे.

पोलीस सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, परळी वैजनाथ येथील एका ३२ वर्षीय गृहिणी महिलेने फेसबुकवर झालेल्या मैत्रीनंतर आपल्यावर बेतलेल्या प्रसंगाबाबत बीड येथील एका आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली आहे. यातील आरोपी अकबर बबन शेख (वय 23 वर्षे रा. तेलगावनाका ईंदिरानगर बीड) याने फिर्यादी महिलेशी फेसबुक अकाउंटवर ओळख करुन घेतली. त्यानंतर सततच्या चॅटिंगमध्ये दोघांची घट्ट मैत्री झाली. या चॅटिंगमधून दोघांनी एकमेकांविषयीची पूर्णपणे माहिती घेतली. मात्र त्यानंतर आरोपीने गैरफायदा घ्यायला सुरुवात केली. संबंधित फिर्यादी महिलेला ब्लॅकमेल करणे सुरु केले. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने तिच्या राहत्या घरी जावून इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. याबाबातची तक्रार पिडित फिर्यादी महिलेने दिली आहे. त्याचबरोबर पिडित महिलेला संशयित आरोपीने मारहाण केल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

या फिर्यादीनंतर आरोपी अकबर बबन शेख (वय 23 वर्षे रा. तेलगावनाका इंदिरानगर बीड) याला अटक केली आहे. त्यानंतर त्याच्याविरुद्ध परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुरनं 46/2024 कलम 376,354, 354 (D), 452,323,506 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या गंभीर प्रकरणी पिंक पथक अंबाजोगाईच्या पोउपनि प्रतिभा एम. शेटे, संभाजीनगर पोनि शेख,सपोनि प्रविण जाधव,पोअं. भगवान गुट्टे आदींनी पुढील तपास करीत आहेत.

Back to top button