MPSC Result : आयटी कंपनीतील नोकरी सोडून एमपीएससीचा अभ्यास सुरु केला; पाथरीतील महिलेची एकाच वर्षात चार पदांना गवसणी | पुढारी

MPSC Result : आयटी कंपनीतील नोकरी सोडून एमपीएससीचा अभ्यास सुरु केला; पाथरीतील महिलेची एकाच वर्षात चार पदांना गवसणी

पाथरी; पुढारी वृत्तसेवा :  पाथरी येथील निता घोरपडे यांनी पुण्यातील आयटी कंपनीतील नोकरी सोडून एमपीएसीमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. एकाच वर्षी त्यांनी ४ पदांना गवसणी घातल्याने त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. एमपीएससीच्या २०२२ च्या परिक्षेत उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाली आहे. (MPSC Result)

बुधवारी (दि. २०) एमएससी २०२२ परिक्षेची अंतिम यादी प्रसिद्ध झाली. या परिक्षेत पुन्हा एकदा निता अंनत घोरपडे यांनी यश मिळवत ‘उपशिक्षण अधिकारी’ हे पदी निवड झाली आहे. यापूर्वी देखील त्यांनी एमपीएससीच्या पदांवर यश मिळवले आहे. सहाय्यक गटविकास अधिकारी पदाचे प्रशिक्षण पूर्ण  लातूर जिल्हापरिषदेमध्ये त्यांची नियुक्ती झाली होती. त्याचबरोबर मंत्रालयीन सहा. कक्षअधिकारी’ आणि ‘राज्य करनिरीक्षक’ या पदांच्या परिक्षा देखील त्या पास झालेल्या आहेत. एकाच वर्षी एकूण चार पदांवर यश मिळवल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

 निता अंनत घोरपडे या पाथरी येथील रहिवासी आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी पुण्यातील आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी एमएससी परिक्षेत यश मिळवलं. या यशानंतर पाथरीसह जिल्ह्यातील विविध संघटनेच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले जात आहे. मुख्याध्यापक सुभाष चिंचाणे, विठ्ठल गिराम, राम घटे, राजेभाऊ मुजमुले, जिल्हा सरकारी अभियोक्ता बाबासाहेब घटे, भारत धनले ऍड. भगवान हिवाळे, बाबा टेंगसे, कमल संजय ऊजगरे, .सर्जेराव गिराम, आशोक गिराम,संजय रणेर, और प्राचार्य त्र्यंबक कदम, संजय ऊजगरे आदिनी विविध कौतुक केले.

Back to top button