आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | रविवार, १० मार्च २०२४

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष : आज ग्रहमान अनुकूल आहे. काही काळापासून सुरू असलेल्या समस्येवर उपाय शोधल्यास दिलासा मिळेल, असे श्रीगणेश सांगतात. कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीसाठी विचार करा. दुपारची परिस्थिती थोडी प्रतिकूल असू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यावसायिक स्पर्धक तुमच्यासमोर आव्हान उभे करू शकतात. कौटुंबिक वातावरणात आनंदी राहिल. वातावरण बदलाचा प्रकृतीवर परिणाम होणार नाही, याची काळजी घ्‍या.

वृषभ : श्रीगणेश सांगतात की, आज पाहुणचारामध्‍ये वेळ जाईल. कुटुंबाच्या सुखासाठी प्रयत्‍नशील असाल. तरुणाई भविष्यातील योजनांबाबत गंभीर असेल. महत्त्‍वाच्‍या कामात चूक होणार नाही याची दक्षता घ्‍या. व्यवसायात अधिक मेहनत
घ्‍यावी लागले. पती-पत्नीमध्ये वाद होण्‍याची शक्‍यता. घरातील वडीलधाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घ्‍या.

मिथुन : आज तुम्ही कठोर परिश्रमाच्‍या जोावर सर्व साध्य करू शकता. वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती असेल. कुटुंबातील सदस्‍यांबरोबर वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. आर्थिक गुंतवूणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्‍या. विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षांकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. प्रकृतीमध्‍ये लहान-मोठे चढउतार जाणवतील.

कर्क : आजचा दिवस कुटुंबासोबत आनंदात जाईल. सुवार्ता समजेल. कार्यकुशलतेच्या जोरावर तुम्हाला यश मिळेल. पण सगळं काही सुरळीत चाललं असलं तरी कुठेतरी कमीपणा जाणवेल. आपल्या भावना आणि रागावर नियंत्रण ठेवा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. कौटुंबिक सुख-शांती कायम राहील. जास्त परिश्रमामुळे थकवा जाणवेल.

सिंह : समारंभात जाण्‍याचा योग येईल. येथे तुमचे स्वागतही आदराने केले जाईल. विवाह, नोकरी इत्यादी मुलांशी संबंधित कामे यशस्वी होतील, असे श्रीगणेश सांगतात. एखाद्यावर जास्त अवलंबून राहणे हानिकारक ठरू शकते.रागावर नियंत्रण ठेवा. घरातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्‍या. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. जुन्या आजाराबाबत काळजी घ्यावी लागेल.

कन्या : श्रीगणेश म्‍हणतात की, आजचा दिवस उत्साहाने परिपूर्ण असा असेल. मात्र मुलांशी संयमाने वागा. नातेवाईकांशी व्यवहार करताना काळजी घ्या. बोलताना काळजी घ्‍या. खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. नवीन लोकांशी व्यावसायिक संबंध सुरू करण्यापूर्वी विचार करा. कुटुंबातील सदस्‍यांचे एकमेकांबद्दलचे प्रेम कायम राहील. बद्धकोष्ठता, पोट फुगणे इत्यादी समस्या जाणवण्‍याची शक्‍यता.

तूळ: आज सर्व सर्मपणाने केलेल्‍या कृतीचे चांगले परिणाम प्राप्त होतील. महिला आपल्‍या व्यक्तिमत्त्वाकडे विशेष लक्ष देतील. निष्काळजीपणा आणि दिरंगाईमुळे आवश्यक व महत्त्वाची कामे अपूर्ण राहू शकतात, असे श्रीगणेश सांगतात. कामाचा दर्जा सुधारल्याचा लाभ होईल. पती-पत्नीमधील मतभेद दूर होतील. डोकेदुखी, ताप इत्यादी हंगामी आजार होऊ शकतात.

वृश्चिक : आज परिस्थितीत सकारात्मक बदल होतील. तुम्‍हाला नवी संधी उपलब्‍ध होतील, असे श्रीगणेश सांगतात. नवीन काही शिकायलाही मिळेल. हा अनुभव व्यावहारिक जीवनात उपयोगी पडणारा असेल. सुवार्ता मिळेल. कौटुंबिक वातावरणात अशांतता राहील. भावंडांशी मतभेद टाळा. उत्पन्नासोबत खर्चही जास्त होईल. जनसंपर्काच्या सीमा वाढवा. आरोग्यात चढउतार होऊ शकतात.

धनु : आज जमीन किंवा वाहनाशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम होऊ शकते, असे श्रीगणेश सांगतात. आप्‍तस्‍वकीयांमध्‍ये चांगला वेळ घालवला जाईल. मुलाखतीतील यशामुळे तरुण वर्गाचा आत्मविश्वास वाढेल. भावना आणि उदारता ही तुमची सर्वात मोठी कमजोरी असेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला थोडा त्रास होईल. कौटुंबिक सदस्यांची कठीण प्रसंगी साथ मिळेल. रक्तदाबाशी संबंधित समस्या जाणवू शकतात.

मकर : आज कोणतीही महत्त्वाची माहिती मिळू शकते. पैशाशी संबंधित कामे पूर्ण होतील. मानसिकदृष्ट्या तुम्हाला आराम वाटेल. तुम्ही पार्टीमध्ये व्यस्त असाल. मुलांबद्दल एक प्रकारची चिंता राहील. विनाकारण भीती आणि अस्वस्थता राहील. परिणामी, तुम्ही तुमच्या क्षमतेचा पुरेपूर उपयोग करू शकणार नाही. कामात अधिक गांभीर्य आणि एकाग्रता असणे आवश्यक आहे, असे श्रीगणेश सांगतात. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. संतुलित आहारासोबतच शारीरिक श्रम, व्यायाम यासारख्या गोष्टींकडेही लक्ष द्या.

कुंभ : आज नशीब तुमच्या पाठीशी असल्याचे श्रीगणेश सांगतात. अडचणी आणि अडथळ्यांना न जुमानता तुम्ही सर्व महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. काही काळापासून सुरू असलेल्या वादातही अटी जपल्या जातील. मित्र आणि सहकाऱ्यांशी संबंध चांगले राहतील, असे श्रीगणेश सांगतात. जमीन किंवा वाहनासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर पुनर्विचार करा. बाहेरच्या व्यक्तीमुळे पती-पत्नीमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. वाहन चालवताना निष्काळजीपणा घातक ठरू शकतो.

मीन : आज सकारात्मक लोकांशी संवाद साधल्याने तुम्हाला समाधान लाभेल. दैनंदिन कामांव्यतिरिक्त, तुम्ही इतर कामे सहजतेने पूर्ण कराल. चुकीच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांशी भागीदारी आणि चालू असलेल्या संबंधांमुळे तणाव कमी होईल, असे श्रीगणेश सांगतात. प्रत्येक कठीण प्रसंगात कुटुंबातील सदस्य तुमच्या पाठीशी उभा राहील. सर्दी, खोकला आणि ऍलर्जीचा त्रास होईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news