आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | रविवार ३ मार्च २०२४

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष : आज घरातील ज्येष्ठांचा आदर केल्याने तुमचे भाग्य वाढेल, असे श्रीगणेश सांगतात. महिलांसाठी आजचा दिवस विशेष शुभ आहे. क्षमता आणि प्रतिभेच्‍या जोरावर त्‍या आपलं ध्‍येय साध्‍य करतील. भूतकाळातील नकारात्मक गोष्टी तुमचा वर्तमानही खराब करू शकतात. पैशाच्या व्यवहाराशी संबंधित काही वैयक्तिक संबंध खराब होऊ शकतात. व्यवसाय क्षेत्रातील कागदाशी संबंधित कामात पूर्ण पारदर्शकता राखणे. पती-पत्नीमध्ये सहकार्याचे नाते राहील. पाय दुखणे, सूज येणे यासारख्या समस्या जाणवतील.

वृषभ: आज भावनेच्‍या आहारी जावूण कोणताही निर्णय घेवू नका, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. मालमत्तेबाबत फायदेशीर चर्चा होईल. रागावर नियंत्रण ठेवा. स्वभावात सकारात्मकता ठेवा. तणावामुळे तुमची काही कामे अपूर्ण राहू शकतात. कार्यक्षेत्रात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. घरातील कामात तुमचे सहकार्य वातावरण चांगले राहील. आरोग्य चांगले राहील.

मिथुन : आज धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात वेळ व्‍यतित कराल. वाहन खरेदीसाठी आजची वेळ योग्य आहे. विद्यार्थी नियोजित ध्‍येय साध्‍य झाल्‍याने तणावमुक्त होतील. बाहेरच्या व्यक्तीला घरात ढवळाढवळ करू देऊ नका. मुलांबरोबर मित्रांसारखे वागवा. त्यांच्यावर जास्त नियंत्रण ठेवू नका, असे श्रीगणेश सांगतात. संपर्क मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करा. पती-पत्नीच्या परस्पर सहकार्यामुळे वातावरण चांगले राहील. रक्तदाबाची समस्या असणार्‍यांनी विशेष काळजी घ्‍यावी.

कर्क : आज राजकीय संबंधांचा तुम्हाला फायदा होईल. जनसंपर्काची व्याप्तीही वाढेल. तुमच्‍या सेवाभावी वृत्तीमुळे वडीलधारी मंडळी खूश होतील. अनोळखी व्यक्तीशी व्यवहार करताना काळजी घ्या, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. व्यावसायिक कामे प्रलंबित राहण्‍याची शक्‍यता. कुटुंब आणि व्यवसाय दोन्हीमध्ये सामंजस्य राखणे आवश्यक आहे. विचारांमधील नकारात्मकतेमुळे तणाव, नैराश्य यासारखी परिस्थिती उद्भवू शकते.

सिंह : श्रीगणेश सांगतात की, आज तुम्‍ही आवडीच्या कामांमध्ये वेळ व्‍यतित कराल. सामाजिक कार्यात सहभागी व्‍हाल. विद्यार्थ्यांना अभ्‍यासात योग्य निकाल मिळण्याने दिलासा मिळेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनातील मतभेद तुमच्‍या सल्‍ल्‍याने सोडवला जावू शकतो. घरात शिस्तबद्ध वातावरण राहील. ताप, खोकला यासारख्या समस्या जाणवण्‍याची शक्‍यता.

कन्या : श्रीगणेश म्हणतात की, आज तुम्ही तुमच्या मेहनतीच्‍या जोरावर परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल कराल. मोठ्या अपेक्षघ पूर्ण करण्यासाठी अयोग्य काम करू नका, अन्यथा तुमची बदनामी होऊ शकते. व्यावसायिक घडामोडींकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. पती-पत्नीचे एकमेकांना सहकार्य लाभेल. सौम्य हंगामी आजार त्रासदायक ठरू शकतात.

तूळ: गणेश सांगतात की, आज तुम्‍ही स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून काम केल्यास अनेक समस्या दूर होतील. नातेवाइकांशी संबंधित वादावर पडदा पडेल. प्रवास टाळणे हितावह ठरेल. रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायाशी संबंधित कामे सकारात्मक परिणाम दाखवतील. कामाच्या ठिकाणचा ताण कुटुंबावर पडणार नाही याची काळजी घ्‍या. आरोग्य उत्तम राहील.

वृश्चिक: श्रीगणेश म्हणतात की, सकारात्मक विचारांमुळे तुम्‍हाला संधी लाभेल. काही खास लोकांच्या संपर्कामुळे तुमची विचारशैली बदलेल. तुमच्या जवळच्या व्यक्तीने तुमच्यावर चुकीची टीका केल्यास तुमचे मन निराश होईल. आपल्या योजना मित्र आणि नातेवाईकांना उघड करू नका. व्यवसायात अधिक मेहनत करावी लागेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आरोग्य उत्तम राहील.

धनु : आज तुमचा शहाणपणाचा निर्णय तुमची आर्थिक बाजू मजबूत करेल. नातेवाइकांशी महत्त्वाच्या विषयावर चर्चा होईल. मनोरंजनासोबतच तुम्हाला तुमच्या वैयक्तिक कामांकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. गरजूंना मदत करताना तुमच्या बजेटची काळजी घ्या, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. व्‍यवसाया संबंधित कामात महत्त्वाचा निर्णय स्वतः घ्या. कौटुंबिक वातावरण सामान्य राहील. रक्तदाब, मधुमेह असणार्‍यांनी आरोग्‍याची काळजी घ्‍यावी.

मकर : श्रीगणेश म्हणतात की, आज सर्व कार्ये योग्‍य पद्धतीने केल्याने तुम्हाला आश्चर्यकारक यश मिळेल. आर्थिक गुंतवणुकीशी संबंधित बाबींवर अधिक लक्ष द्याल. तुमच्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. घरातील ज्येष्ठ सदस्याच्या तब्येतीची चिंता राहील. कार्यक्षेत्रात कोणाशीही व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. पती-पत्नीमधील गैरसमज दूर होतील. यावेळी बाहेरचे खाणे टाळावे.

कुंभ: कर्मावर विश्वास ठेवणे आज तुमच्यासाठी फलदायी ठरेल. राजकीय, सामाजिक कार्यातही तुमचा वेळ जाईल. एखादी छोटीशी समस्या घरामध्ये मोठी समस्या बनू शकते. बाहेरच्या व्यक्तीला कुटुंबात ढवळाढवळ करू देऊ नका. काहीवेळा तुमच्या अती शिस्तबद्ध वर्तनामुळे कुटुंबातील सदस्यांना त्रास होऊ शकतो. सार्वजनिक व्यवहार, मीडिया, मार्केटिंग इत्यादींशी संबंधित व्यवसाय आज फायदेशीर ठरतील. वाहन जपून चालवा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

मीन: आज ग्रहस्थिती अनुकूल आहे. लाभाचे नवीन मार्ग मिळू शकतात. काही काळापासून सुरू असलेल्या समस्या योग्य प्रकारे सोडवल्या जातील. प्रभावशाली व्यक्तीशी झालेली भेट तुमच्यासाठी महत्त्वाची ठरेल. अतिआत्मविश्वासामुळे त्रास होईल. जवळच्या मित्र किंवा नातेवाईकासोबत मनस्ताप होऊ शकतो. रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराचा आत्मविश्वास आणि पाठिंबा तुमचे मनोबल उंचावेल, असे श्रीगणेश म्‍हणतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news