आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | गुरुवार, २९ फेब्रुवारी २०२४

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.

मेष : काही काळापासून सुरू असलेले अडथळे दूर करण्यात आज यश मिळेल. त्यामुळे तुम्हाला आत्मसमाधान मिळेल, असे श्रीगणेश सांगतात. राजकीय, सामाजिक कार्यात विशेष योगदान मिळेल. स्वतःच्या जवळच्या मित्राचा विश्वासघात होऊ शकतो याची जाणीव ठेवा. तरुणांचे करिअरकडे दुर्लक्ष भविष्यासाठी घातक ठरू शकते. कार्यक्षेत्रात एखाद्या खास व्यक्तीशी झालेली भेट प्रगती आणि विजयासाठी उपयुक्त ठरेल. पती-पत्नीचे नाते अधिक घनिष्ठ होईल.

वृषभ : आज जमीन-मालमत्ता आणि गुंतवणूक यासारख्या कामांमध्ये तुम्ही व्यस्त राहू शकता, असे श्रीगणेश सांगतात. तुम्ही प्रत्येक कामात रस घ्याल आणि तुमच्या क्षमतेनुसार काम पूर्ण कराल. सर्व काही ठीक असले तरी मनात नकारात्मक विचार येऊ शकतो. काही वेळ ध्यान केल्‍याने तुम्हाला आराम मिळेल. तरुणांना त्यांच्या करिअरशी संबंधित कामांमध्ये अधिक लक्ष देण्याची गरज आहे. व्यावसायिक कामे वाढतील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहू शकते.प्रकृतीच्‍या किरकोळ तक्रारींमुळे त्रास होईल.

मिथुन : श्रीगणेश म्हणतात की, आज मानसिकदृष्ट्या तुम्ही सक्षमता अनुभवाल. तसेच व्यक्तिमत्व सुधारण्‍यावरही तुमचा भर असेल. महत्त्वाच्या व्यक्तीची भेट फायदेशीर ठरेल. वाहन किंवा घराच्या दुरुस्तीशी संबंधित कामांवरील खर्चामुळे बजेट बिघडू शकते. नातेवाईकांशी चांगले संबंध ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. कुटुंबासोबत खरेदी आणि आरामशी संबंधित गोष्टींमध्ये वेळ जाईल. हंगामी आजार त्रासदायक ठरू शकतात.

कर्क : आज काही कामात चांगले यश मिळाल्याने उत्साह वाढेल. कोणत्याही स्पर्धात्मक क्षेत्रात यश मिळण्याची उत्तम संधी आहे. करिअर आणि वैयक्तिक कामांमध्ये अहंकार आड येणार नाही याची काळजी घ्‍या, अन्यथा याचे नकारात्‍मक परिणाम होतील. खूप घाई आणि उत्साह एखाद्याशी संबंध खराब करू शकतो. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी झालेली भेट तुमच्या व्यवसायात उपयुक्त ठरू शकते. कौटुंबिक वातावरण मधुर असू शकते. आरोग्य चांगले राहिल, असे श्रीगणेश सांगतात.

सिंह: श्रीगणेश म्‍हणतात की, आज ग्रहमान अनुकूल आहे. लाभाचे नवीन मार्ग मिळतील. कोणतीही दीर्घकाळची चिंता दूर होऊ शकते.आर्थिक बाबतीत ठोस आणि महत्त्वाचा निर्णयही यशस्वी होईल. विरोधकांच्या हालचालींकडे दुर्लक्ष करू नका. एखाद्या लहानसहान गोष्टीवरून वाद होऊ शकतो. मुलांचा ताण कमी करण्यासाठी त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवा. व्यवसायिक कामे सुरळीत पार पडतील. जोडीदारासोबत काही वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तणावामुळे थकवा आणि अशक्तपणा येऊ शकतो.

कन्या : आज वेळ महत्त्‍वाचा असून त्‍याचा पुरेपूर फायदा घ्या, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. नवीन घर किंवा मालमत्ता खरेदीचा विचार करत असाल निर्णय ठरण्‍याची शक्‍यता. विद्यार्थी विचारात जास्त वेळ घालवू शकतात. त्यामुळे यश हातातून निसटू शकते. व्यावसायिक महिला विशेषतः त्यांच्या व्यवसायाकडे अधिक लक्ष देतील. पती-पत्नीचे नाते मधुर राहील. पोटाशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात.

तूळ : श्रीगणेश म्हणतात की, तुम्ही तुमच्‍या नम्रपणामुळे संबंध सुधारण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या सकारात्मक विचारसरणीप्रमाणे नशिबाच्या अपेक्षेने कर्मावर विश्वास ठेवल्याने परिस्थिती अनुकूल होईल. काही वेळा तुमचा आनंदी स्वभाव इतरांना त्रास देऊ शकतो. घरामध्येही एखाद्या छोट्या गोष्टीवरून कुटुंबातील सदस्यांसोबत गैरसमज होऊ शकतात. पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतो. आरोग्य उत्तम राहू शकते.

वृश्चिक : आज मनोरंजनात वेळ जाईल. तसेच कुटुंबासोबत धार्मिक स्थळी जाण्याचा कार्यक्रमही होईल. तुमच्या व्यक्तिमत्त्वातही सकारात्मक बदल अनुभवाल. अचानक काही मस्या उद्भवू शकतात. समजूतदारपणाने त्‍यावर मात कराल. कार्यक्षेत्रात अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल. आरोग्य उत्तम राहू शकते.

धनु: श्रीगणेश म्हणतात की , आज अध्यात्मिक कार्यात तुमची रुची राहील. वाहन किंवा घराशी संबंधित कागदपत्रे ठेवा. कधीकधी एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल जाणून घेण्याची इच्छा तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर नेऊ शकते. व्यावसायिक स्पर्धेत काही प्रमाणात नुकसान होऊ शकते. पती-पत्नीचे नाते अधिक गोड होऊ शकते. युरिन इन्फेक्शन सारख्या समस्या उद्भवू शकतात.

मकर: श्रीगणेश सांगतात की, तुमची दैनंदिन दिनचर्या व्यवस्थित ठेवून तुमची विशेष प्रतिभा जागृत करण्यात वेळ जाईल. विशेषत: विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेत यश मिळेल. एखाद्या धार्मिक उत्सवात गैरसमजामुळे कोणाशी वाद होऊ शकतो. कार्यक्षेत्रातील कामांमध्ये काही अडथळे येऊ शकतात. जोडीदाराशी वाद होऊ शकतो. आरोग्य उत्तम राहू शकते.

कुंभ : आज वडिलधाऱ्यांचा स्नेह आणि आशीर्वाद तुमच्यावर राहील, असे श्रीगणेश सांगतात. गरजू मित्राला मदत केल्याने आनंद मिळेल. कोणत्याही प्रकारे आपल्या तत्त्वांशी तडजोड करू नका. भावांसोबत गोड संबंध ठेवा. विद्यार्थी अभ्यासापासून विचलित होऊन चुकीच्या कामात गुंतू शकतात. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अडचणी येऊ शकतात. जास्त कामामुळे तुम्ही कुटुंबाकडे लक्ष देऊ शकणार नाही.

मीन: श्रीगणेश म्‍हणतात की, तुम्ही तुमच्या समज आणि बुद्धीच्या जोरावर तुमची कामे योग्य प्रकारे पूर्ण करू शकाल. नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास मोठे यश मिळू शकते. घरात मित्र किंवा पाहुणे येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करु नये. पती-पत्नीचे नाते मधूर राहिल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news