गडकरी म्हणाले, 'ज्ञान ही भारताची सर्वांत मोठी शक्ती आहे. आपले विद्यार्थी जगभरात आयटीच्या क्षेत्रात उत्तम काम करीत आहेत. नागपूरला आयटी हब म्हणून विकसित करण्यासाठी आपण पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. मिहानमध्ये एचसीएल, टीसीएस, राफेल यासह आणखी मोठ्या कंपन्या आल्या आहेत. एव्हीएशनच्या क्षेत्रात एमआरओची सुविधाही आपण सुरू केली आहे. त्यामुळे नागपूर केवळ आयटी हब म्हणून नव्हे तर एव्हीएशन हब म्हणूनही विकसित होऊ लागले आहे. गुमगावच्या बाजुला आणखी जागा घेऊन मिहानचा विस्तार करता येईल का, याचा विचार आम्ही करतोय.' नागपुरात ट्रिपल आयटीच्या नव्या इमारतीचे व परिसराचे आज उद्घाटन होत आहे, ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे.देशात 20 ट्रिपल आयटी स्थापन करण्याची चर्चा झाली तेव्हा मी शिक्षण मंत्र्यांना नागपूरचाही समावेश करण्याचा आग्रह केला होता, याचाही गडकरी यांनी आवर्जून उल्लेख केला. मिहानमध्ये येत्या काळात मेट्रो पोहोचणार आहे. आजच मी अंडरपास तयार करण्याचेही आदेश दिले आहेत. लवकरच इथे येणारा रस्ता सहा पदरी होईल. राज्य सरकारने मिहानच्या आत चार पदरी काँक्रिटचे रस्ते केल्यास कनेक्टिव्हिटी वाढेल, असेही गडकरी म्हणाले.