रत्नागिरीत आज 196 श्रीराम मंदिरांत प्राणप्रतिष्ठा सोहळा | पुढारी

रत्नागिरीत आज 196 श्रीराम मंदिरांत प्राणप्रतिष्ठा सोहळा

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : अयोध्येत सोमवारी 22 जानेवारी रोजी श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यानिमित्त देशभरात जल्लोष होत असून, सर्वत्र भगवे वातावरण निर्माण झाले आहे. त्या निमित्ताने जिल्ह्यातील 196 राममंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 4663 ग्रामदेवता मंदिरांवर विद्युत रोषणाईसह काही ठिकाणी महाआरत्यांचेही आयोजन करण्यात आले आहे.

रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध अशा श्रीराम मंदिरामध्ये सकाळी 7 वाजल्यापासून राम दरबारातील देवतांची षोडषोपचार पूजा झाल्यावर उत्सवाला प्रारंभ होणार आहे. सकाळी शहर व परिसरातील नामवंत भजन मंडळांची भजने होणार आहेत. सकाळी 11 ते 1 यावेळेत महिला व पुरुष पथकांकडून रामरक्षा पठण होणार आहे. त्याचप्रमाणे सर्व भाविकांना संपूर्ण दिवसभर राम दरबारातील गर्भगृहात जाऊन प्रभू रामाची स्वहस्ते पूजा करता येणार आहे. सायंकाळी 4 वा. प्रभू रामाची शोभायात्रा रामसवारी निघणार आहे. दिवसभर विविध भजन पथकांची भजने सुरू राहणार असून सायंकाळी 7.30 वा. राममंदिरात महाआरती होणार आहे. या महाआरतीचा मान पान 2 वर भगिनीवर्गाला देण्यात आला आहे. शहरातील सर्व भगिनींनी या महाआरतीला उपस्थित रहावे असे आवाहन राम मंदिर समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

पालकमंत्री उदय सामंत व नगर परिषद रत्नागिरीच्या वतीने सोमवार? ? 22 जोनवारी 2024 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत प्राणप्रतिष्ठापणा सोहळयाचे थेट प्रक्षेपण जयेश मंगल कार्यालय रत्नागिरी व राममंदिर रामआळी रत्नागिरी येथे करण्यात येणार आहे.

पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार शहरातील मल्टीफ्लेक्समध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे मोफत प्रक्षेपण केले जाणार आहे.रत्नागिरी शहर व परिसरातील हनुमान मंदिरे व अन्य मंदिरांमध्येही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आली आहेत.

जिल्ह्यात तब्बल 196 श्रीरामाची मंदिरे असून या ठिकाणी विविध कार्यक्रम सकाळपासून सायंकाळी उशिरापयर्र्त होणार आहेत. जिल्ह्यातील 4663 ग्रामदेवता मंदिरांवर विद्युतरोषणाई करण्यात आली असून ग्रामस्थांनी विविध कार्यक्रमांसह दीपोत्सवही आयोजित केला आहे.रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सर्व नागरिकांना घरोघरी गुढ्या उभारण्याचे आवाहन केले असून, प्राणप्रतिष्ठापना सोहळा जल्लोषात केला जाणार आहे.

दापोलीत हत्तीवरून साखर वाटणार !

दापोली : गेली पाचशे वर्षे ज्या क्षणाची समस्त हिंदूधर्मीय जनता वाट पाहत होती तो क्षण आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होणार असून त्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त जालगावसह दापोलीमध्ये हत्तीवरून साखर वाटप करीत शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. दापोली-दाभोळ या मार्गावरून या भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून, जालगाव भैरी मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्यापर्यंत प्रभू श्रीरामासह व हनुमानाचे मोठमोठे 8 कटाऊटस्, रस्त्याच्या दुतर्फा भगव्या झेंड्यांसह संपूर्ण रस्त्यावर विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे.

Back to top button