ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण नाहीच : भुजबळ

ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण नाहीच : भुजबळ

 बीड, पुढारी वृत्तसेवा : कितीही दबाव गट निर्माण केला तरी मराठा समााजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही. मग कितीही आयोग आणा, कारण प्रबळ असला तरी सामजिक दृष्टा मागास नाहीच आहात, अशा रोखठोक शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी महा एल्गार सभेतून आपली भुमीका मांडली. यावेळी हजारोंच्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते.

पुढे बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले, मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाहीच, परंतू ओबीसींच्या हक्कावर गदा येऊ ते तुम्हाला मिळणार नाही. जाळपोळीचे समर्थन तर कधीच करणार नाही. ज्यांनी जाळपोळ केल त्यांना सोडा, जामीन द्या असे सांगत दबाव आणत आहात म्हणजे तुम्हीच यामागे आहात. दोषी, आरोपी यांना बळ दाखवून सोडवण्याची भाषा करणे हा कसला न्याय? ओबीसीच्या आरक्षणाला जनतेत काय अन् कोर्टात काय? धक्का लागता कामा नये. सरकार म्हणून आमची भूमीका मांडा, कारण आम्ही 50 टक्क्यापेक्षा आहोत. त्यांच्यासाठी रातोरात निर्णय होंतात.. आयोग नेमले जातात. तिन- तिन आयोग. ओबीसींवर अन्याय होत आहे, त्यावर कोणता आयोग? असा थेट सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी केला. बाबासाहेबंची आम्हाला शिकवण आहे. त्यांनी संविधानात लिहीलेले आरक्षण वाचवणे ही आमची जिम्मेदारी आहे. तुम्हाला तुमचे स्वतंत्र आरक्षण आहे. 10 टक्कयात तुम्ही 8 टक्के आहात. वाटल्यास दहा टक्कयाचे 15 टक्के घ्या, परंतू ओबीसी आरक्षणाला धक्का लावू देणार नाही, अशा रोखठोक शब्दात भुजबळ यांनी भुूमीका मांडली.

तुम्हाला आमच्या ताटातलेच हवे हा अन्याय आहे

तुम्ही घरे जाळता, दगडफेक करता. आम्ही गप्प आहोत, आजही तुमच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. परंतू आमच्या ताटातलेच हवे हा अन्याय आहे. लोक, सरकार, प्रशासन यांना वेठीस धरणे चूकरीचे आहे. या परिस्थितीत तुम्ही एकत्रीत संख्येच्या बळावर दबाव, अन्याय अन् घरांची जाळपोळ करणार असाल तर आम्ही देखील मेलेल्या आईचे दुध पेलोलो नाही, असे धमाकेदार भाषण बीड येथील ओबीसी महाएल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news