भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यातील वैद्यनाथ कारखान्याचा होणार लिलाव | पुढारी

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यातील वैद्यनाथ कारखान्याचा होणार लिलाव

बीड; पुढारी वृत्तसेवा : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ कारखान्यावरील थकीत कर्जापोटी युनियन बँकेने आता लिलावासाठी नोटीस प्रसिद्ध केली आहे. कारखान्याकडे तब्बल 203 कोटी रुपयांचे कर्ज थकीत असून या पोटी कारखान्याच्या मालमत्तेचा लिलाव ऑनलाइन पद्धतीने केला जाणार आहे. यासाठी ची प्रक्रिया 25 जानेवारी रोजी पार पडणार असल्याचेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. नोटीस मध्ये वैद्यनाथ कारखान्याच्या संचालक मंडळाची नावे आहेत.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ कारखाना गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणीत आहे. यामुळे कारखान्यासमोरील कर्जाचा डोंगर वाढतच गेला असून आता युनियन बँकेने या कारखान्याच्या लिलावासाठी नोटीस प्रसिद्ध केली आहे. 25 जानेवारी रोजी याची ऑनलाईन प्रक्रिया होणार असल्याचे नोटीस मध्ये नमूद करण्यात आले असून संपूर्ण संचालक मंडळाचे देखील नावे नोटिसमध्ये आहेत.

दरम्यान यापूर्वीच पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्यावर जीएसटी विभागाने देखील दंड ठोठावला होता यानंतर आता ही कारवाई झाल्याने कारखाना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Back to top button