भंडारा : सनफ्लॅग कंपनीत स्फोट, ३ कामगार जखमी | पुढारी

भंडारा : सनफ्लॅग कंपनीत स्फोट, ३ कामगार जखमी

भंडारा ; पुढारी वृत्‍तसेवा सनफ्लॅग आयर्न अँड स्टील कंपनीत आज (मंगळवार) पहाटे ३.१५ वाजता स्फोट झाला. यात ३ कामगार जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी नागपूर येथील खासगी रुग्णालयात तात्काळ हलवण्यात आले आहे. या दुर्घटनेत ७ – ८ कामगार किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

सदर घटना कंपनीतील एसएमएस या विभागातील एल एच एफ युनिट मध्ये झाली. घटनेचे मूळ कारण अजून गुलदस्त्यात असून, हिटिंग फरनेस मध्ये अचानक मोठा स्फोट झाल्याने कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. या भागात कार्यरत ३ कामगार काही प्रमाणात भाजले गेले आहेत तर काही कामगार किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

यात टेक्निशीयन नामदेव झंझाड, अभियंता सागर गभने व कंत्राटी कामगार हटवार हे जखमी झाले आहेत. त्यांना नागपूर येथे हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली आहे.

स्फोट एवढा भयानक होता की, कंपनीतील जवळपासचा परिसर हादरला. या दुर्घटनेत कंपनीतील साहित्‍याचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने प्राणहानी झालेली नाही.

Back to top button