Matthew Perry : केटामाइनच्या ओव्हरडोसमुळे झाला मॅथ्यू पेरी यांचा मृत्यू , पोस्टमार्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा | पुढारी

Matthew Perry : केटामाइनच्या ओव्हरडोसमुळे झाला मॅथ्यू पेरी यांचा मृत्यू , पोस्टमार्टम रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘फ्रेंड्स’मध्ये चँडलर बिंगची भूमिका साकारणारा अभिनेता मॅथ्यू पेरी यांचे २८ ऑक्टोंबर रोजी निधन झाले होते. वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, शवविच्छेदन अहवालातून त्याच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे. मॅथ्यू पेरी याचा शवविच्छेदन अहवाल शुक्रवारी (दि.१५) प्रसिद्ध करण्यात आला. यानुसार, “केटामाइनच्या ओव्हरडोसमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या केटामाईनमुळे तो बाथटबमध्ये बेशुद्ध झाला होता.” तिथेच त्याचा मृतदेह आढळला होता. त्यांचे निधन झाल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे.

मॅथ्यू पेरी यांच्या मृत्यूच्या सुमारे सात आठवड्यांनंतर लॉस एंजेलिस काउंटी मेडिकल एक्झामिनरचा अहवाल आला आहे. या अहवालात अंमली पदार्थ आणि दारूचा गैरवापर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या असिस्ंटटला घरात खालील बाजूस बाथटबमध्ये मृतदेह तरंगताना आढळला. रिपोर्ट्सनुसार, मॅथ्यू पेरीला केटामाइनच्या ओव्हरडोसमुळे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला असावा. हॉट टबमध्येच तो बेशुद्ध झाला असावा, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचलंत का?

 

Back to top button