

पुढारी ऑनलाईन डेस्क : संसदेत घुसखोरी केलेले तरुण महुआ मोइत्रा यांच्या संपर्कातील असल्याचा खळबळजनक दावा खासदार नवनीत राणा यांनी आज (दि. १३) केला. माध्यमांशी बोलताना केलेल्या या विधानानंतर आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
संसदेत आज काही तरुणांनी घुसखोरी करत स्मोक कँडलद्वारे धूर पसरवल्याची घटना घडली. ही घटना घडल्यानंतर या तरुणांना संसदेत प्रवेश कोणी दिला असा सवाल उपस्थित केला जात आहे. नवनीत राणा यांनी केलेल्या एका विधानाने आता प्रकरणात महूआ मोईत्रा यांचे नाव चर्चेत आले आहे. राणा यांनी संसदेचे खासदारकी रद्द केल्याप्रकरणी महुआ यांच्या मनात राग आहे. त्यामुळे संसदेत घुसखोरी करणाऱ्या तरुणांशी महुआ संपर्कात असल्याची शक्यता राणा यांनी व्यक्त केली आहे.