चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
मेष : आज तुम्ही तुमच्या कौशल्याच्या जोरावर अनेक कामे योग्य प्रकारे पूर्ण कराल, असे श्रीगणेश सांगतात. कोणताही निर्णय व्यावहारिक घ्या, तो उत्कृष्ट परिणाम देईल. अफवांकडे दुर्लक्ष करा. एखाद्याचे गैरसमज तुमच्या समस्या वाढवतील. रागावर नियंत्रण ठेवा. व्यावसायिक योजनांमधून उत्कृष्ट परिणाम मिळू शकतात. घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. . छातीत संसर्ग आणि जळजळ अशा समस्या भेडसावण्याची शक्यता.
वृषभ: कौटुंबिक आणि आर्थिक बाबतीत महत्त्वाचे निर्णय घेतल्यास सकारात्मक परिणाम मिळू शकतात, असे श्रीगणेश सांगतात. आवडीच्या कामांना वेळ दिल्यास आध्यात्मिक आनंद मिळू शकतो. मात्र निर्णय घेण्यात जास्त वेळ घालवू नका जेणेकरून यश तुमच्या हातातून निसटून जाईल. बोलताना शब्द जपून वापरा. व्यवसायात गुंतवणुकीसाठी सध्याचा काळ अनुकूल नाही. मनोरंजनसाठी वेळ वाया घालवू नका. सांधेदुखी आणि उच्च रक्तदाबाची समस्या जाणवू शकते.
मिथुन : आज कौटुंबिक समस्या सोडविण्यात यश मिळेल. महत्त्वाच्या व्यक्तीच्या भेटीमुळे नवी ऊर्जा अनुभवायला मिळेल. महत्त्वाची कागदपत्रे आणि वस्तू गहाळ होणार नाहीत, याची काळजी घ्या. मुलांना त्याच्या समस्या सोडविण्यासाठी मदत करा, असा सल्ला श्रीगणेश देतात.व्यावसायिक कामात गाफील राहू नका. जोडीदाराचा भावनिक आधार तुमच्या कार्यक्षमतेला नवी ऊर्जा देईल.
कर्क : श्रीगणेश म्हणतात, आज तुमची स्वप्ने आणि आशा पूर्ण करण्याचा दिवस आहे. इतरांच्या सल्ल्याऐवजी स्वतःच्या निणयावर ठाम राहा. पैशाची आवक वाढेल त्याचबरोबर खर्चही वाढतील. बाहेरच्या व्यक्तीला कुटुंबात आणि व्यवसायात ढवळाढवळ करू देऊ नका. कर्मचाऱ्यांचे सहकार्य तुमच्यासाठी आवश्यक आहे. व्यवसायाच्या ठिकाणी केलेल्या मेहनतीचे योग्य फळ न मिळाल्याने मनात थोडी चिंता राहील. प्रेमप्रकरणांपासून दूर राहणे चांगले. आरोग्य चांगले राहिल.
सिंह : श्रीगणेश म्हणतात की, आज अध्यात्मिक विचार तुम्हाला सकारात्मक आणि संतुलित करेल. आर्थिक बाबतीतही यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. ग्रहांची स्थिती अनुकूल असू शकते. फोन आणि मित्रमैत्रिणींमध्ये व्यस्त राहून वेळ वाया घालवू नका. कधीकधी तुमची इच्छाशक्ती आणि अतिआत्मविश्वास तुमचा विश्वासघात करू शकतो. सासरच्या लोकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा. व्यवसायात सध्या सुधारणा होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या. आरोग्य चांगले राहू शकते.
कन्या: आज विद्यार्थ्यांना कोणत्याही स्पर्धेशी संबंधित परीक्षेत योग्य निकाल मिळेल. आज एक स्वप्न पूर्ण होणार आहे त्यामुळे मेहनत करा. यावेळी ग्रहस्थिती तुमच्यासाठी अनेक शुभ संधी घेऊन येत आहे, असे श्रीगणेश सांगतात. काम टाळण्याचा प्रयत्न करू नका. अनेक कामांमध्ये विलंब होऊ शकतो. बोलताना काळजी घ्या.व्यवसायाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे कामात पूर्ण सहकार्य राहील. जास्त कामामुळे थकवा आणि अशक्तपणा येऊ शकतो.
तूळ : आज ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि सहकार्य तुमच्यासोबत असेल, असे श्रीगणेश सांगतात. तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामांवर योग्य लक्ष केंद्रित करू शकाल. राग आणि घाई तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी त्रासदायक ठरु शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा. नोकरदारांवर वरिष्ठांची मर्जी राहिल. कुटुंबातील सदस्यांसोबत काही वेळ मनोरंजनाचे कार्यक्रम करा. आरोग्य चांगले राहू शकते.
वृश्चिक : आज मौजमजेकडे दुर्लक्ष करत कामावर लक्ष केंद्रित करा. घरामध्ये नवीन सजावटीसाठी काही योजना देखील असतील. कुटुंबातील सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असेल. चोरी किंवा कोणत्याही प्रकारचे नुकसान होण्याचा धोका संभवतो. कोणतेही काम करताना निष्काळजीपणा करू नका, असा सल्ला श्रीगणेश देतात. तुमच्या निर्णयाला इतर लोकांपेक्षा प्राधान्य द्या. कार्यक्षेत्रात अधिक काम होऊ शकते. पती-पत्नी एकमेकांच्या नात्यात गैरसमज निर्माण होऊ देत नाहीत. तणावामुळे तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होईल.
धनु: श्रीगणेश म्हणतात की, आजतुमचे काम नियोजनबद्ध पद्धतीने करा. तुमचा संपर्क वाढवा. तुम्हाला नक्कीच यश मिळू शकेल. मालमत्तेशी संबंधित कामांमध्येही फायदेशीर सौदे होऊ शकतात. आळस टाळा, अन्यथा कामे लांबणीवर पडतील. जुन्या नकारात्मक गोष्टी नातेवाईकांमध्ये कटुता आणू शकतात. व्यावसायिक व्यवहारात अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. प्रेमाच्या प्रसंगात भावनिक अंतर वाढू शकते.
मकर : गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित कामे आज पूर्ण होतील, असे श्रीगणेश सांगतात. तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला योग्य फळ मिळेल. आर्थिक व्यवहारांकडे दुर्लक्ष करु नका. व्यावसायात लाभ मिळेल. कागदपत्रे गहाळ होणार नाही याकडे लक्ष द्या. आरोग्य चांगले राहिल.
कुंभ : विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक कार्यात यश मिळण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे तुमच्या ऊर्जेचा पुरेपूर वापर करा, असे श्रीगणेश सांगतात. आज केलेल्या मेहनतीचे नजीकच्या भविष्यात चांगले परिणाम दिसतील. चर्चेमध्ये अधिक वेळ घालवू नका. खर्च होईल;पण उत्पन्नही वाढलेले असेल. जनसंपर्क तुमच्यासाठी नवीन व्यवसायाची संधी निर्माण करु शकात संसाधने निर्माण करू शकतात.
मीन: श्रीगणेश सांगतात की, आज दिवसाच्या सुरुवातीला महत्त्वाच्या कामांचे नियाजन करा. दुपारी परिस्थिती अतिशय अनुकूल असल्याने कामे व्यवस्थित पार पडतील. भावनेच्या आहारी जावू नका. आळस टाळा अन्यथा यश हातातून निसटू शकते. घरातील मोठ्यांनाही तुमच्या देखरेखीची गरज आहे. कार्यक्षेत्रात सामानाशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवल्यास नुकसान होऊ शकते. मित्रांसोबत कौटुंबिक भेटीचा कार्यक्रम होऊ शकतो. आरोग्य चांगले राहू शकते.