Shankar Borhade : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शंकर बोऱ्हाडे यांचे निधन | पुढारी

Shankar Borhade : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शंकर बोऱ्हाडे यांचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : नाशिक येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शंकर बोऱ्हाडे (Dr. Shankar Borhade) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन (Passed Away) झाले. नाशिकमधील गुरुजी रुग्णालयात उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळं नाशिकच्या साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे.

गेली ४० वर्षे साहित्य क्षेत्रात शंकर बोऱ्हाडे सक्रिय होते. त्यांचे मरणगाथा (कवितासंग्रह), कडा आणि कंगोरे (व्यक्तिचित्र संग्रह) उजेडा आधीचा काळोख (ललित) देशभक्त शेषराव घाटगे (चरित्र) विडीची गोष्ट (उद्योगाचे चरित्र) शोध डॉ वसंतराव पवारांचा, लोकपरंपरेचे सिन्नर ही संपादित पुस्तके प्रसिद्ध असून त्यांनी सार्वजनिक वाचनालयात विश्वस्त म्हणून काम केले होते. ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजनात त्यांचा सहभाग होता. मराठीचे प्राध्यापक असणारे डॉ.बोऱ्हाडे यांनी साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात आपले योगदान दिले.

Back to top button