

– ज्यो. मंगेश महाडिक
मेष ः कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरेल. वाट पाहत असलेली कीर्ती आणि मान्यता त्यांना मिळेल. मनोबल उंचावेल.
वृषभ ः जीवनाच्या वाईट कामात पैसा कामी येईल म्हणून आजपासूनच पैशाची बचत करण्याचा विचार करा. विचारपूर्वक कोणताही निर्णय घ्या.
मिथुन ः तुम्ही सरळ उत्तरे दिली नाहीत, तर सहकारी त्रासून जाण्याची शक्यता. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल.
कर्क ः आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुमची प्रलंबित देणी आणि बिले देण्यास उपयोगी पडतील. मनावर दडपण असेल; पण काळजी करू नका.
सिंह ः सहकुटुंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येकजण आनंद आणि निवांत राहील. आजचा दिवस अनुकूल आहे. आत्मविश्वास वाढेल.
कन्या ः अभ्यासावेळीही बाहेरील उपक्रमांत भाग घेण्याचा अतिरेक केल्याने पालकांच्या रोषास कारणीभूत व्हावे लागेल. तणाव घेऊ नका.
तूळ ः कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो; पण काळजी न करता वाटचाल करा.
वृश्चिक ः आरोग्यविषयक प्रश्नांमुळे कदाचित तुम्हाला अशांततेचा सामना करावा लागेल. आपले काम आणि प्राथमिकता यावर सारे लक्ष केंद्रित करा.
धनु ः व्यवसायात आपल्या स्पर्धकांच्या तोडीस तोड राहण्यासाठी आपल्या विचारांची स्पष्टता उपयोगी पडेल. आर्थिक आवक चांगली होईल.
मकर ः आजचा दिवस फारसा लाभदायक नाही. त्यामुळे पैशांची स्थिती तपासा आणि आपल्या खर्चांवर मर्यादा घाला. तणाव घेऊ नका. सर्व काही सुरळीत होईल.
कुंभ ः स्वत:ला क्रिएटिव्ह कामात गुंतवून घ्या. काहीही न करता बसून राहण्याची आपली सवय मानसिक शांततेला घातक ठरू शकते.
मीन ः प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. प्रलंबित देणी द्यावी लागतील. त्यामुळे मनावरील ओझे कमी होईल.