सोशल क्लबच्या नावाखाली जुगाराचे अड्डे!; मुद्देमाल जप्त

सोशल क्लबच्या नावाखाली जुगाराचे अड्डे!; मुद्देमाल जप्त
Published on
Updated on

पनवेल: पुढारी वृत्तसेवा : सोशल क्लबच्या नावाखाली जुगाराचे अड्डा चालवणाऱ्या, कामोठेमधील विनम्र वेलफेयर सोशल क्लबवर छापा टाकत नवी मुबई पोलिसांच्या पथकाने जुगाराचा अड्डा उध्वस्त केला. या कारवाईत घटनास्थळावरून पोलिसांनी जुगार खेळत बसलेल्या १५ व्यक्तींना ताब्यात घेऊन अटक केली आहे. तसेच काही रोख रक्कम देखील जप्त केली आहे. या कारवाईमुळे सोशल क्लबमधील काळे धंदे पुन्हा उघड झाले आहेत.

कामोठे सेक्टर १२ मधील पुष्प संगम बिल्डींगमध्ये विनम्र वेलफेयर सोशल क्लबच्या नावाखाली जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती नवी मुबई पोलिसांच्या पथकातील मध्यवर्ती गुन्हे शाखा यांना मिळाली होती. या मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक कामोठे पोलिसांच्या मदतीने वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय कांबळे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक किरण राऊत, तसेच मध्यवर्ती गुन्हे कक्षाचे पोलिस निरीक्षक सुनील शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक तुगेनवर, अलका पाटील आणि अन्य पोलिसांच्या पथकाने विनम्र वेलफेयर सोशल क्लब कामोठे वर छापा टाकला. क्लबमध्ये जुगार खेळला जात असल्याचे पोलिसांना दिसून आले.

पोलिसांनी घटनास्थळाची पहाणी केली असता काही सदस्य हे क्लबचे मेंबर असल्याचे दिसून आले. मात्र, काही मेंबर हे केवळ जुगार खेळण्यासाठी आले असल्याचे समोर आले आहे. काही मुद्देमालसह जवळपास १४ हजार १५० रुपयांची रोख रक्कम पोलिसांना मिळून आली आहे.

तसेच टेबल क्रमाक लिहिलेले रजिस्टर, प्लस्टिक कॉइन असा मुद्देमाल पोलिसाना मिळून आला आहे. सोशल क्लबच्या नावाखाली हे उदयोग केले जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. या सोशल क्लबचे मालक विश्वनाथ हेगडे यांनी हा क्लब जुगार खेळण्यासाठी स्वतःचा फायदा होण्यासाठी रत्नाकर शेट्टी याना दिला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांच्या पथकाने या क्लबमधून १५ व्यक्तींना पोलिसांनी अटक करून नोटीस बजावून सोडून दिले आहेत.

क्लबच्या नावाखाली जुगाराचे अड्डे

विनम्र सोशल क्लबच्या नावाने परवानगी असलेल्या, क्लबमध्ये जुगाराचा अड्डा चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होता. यानंतर पोलिसांनी क्लबमध्ये धाड टाकून जुगाराचा अड्डा उध्वस्त केला. आणि ५०० रुपयांच्या २४ नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

जुगारासाठी रोख रक्कमेचा वापर

मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखा नवी मुबई आणि कामोठे पोलिसांनी टाकलेल्या या धाडीत, भारतीय चलनाच्या ५०० रुपयांच्या २४ नोटा तसेच १०० रुपये दराच्या १८ नोटा, ५० रुपये दराच्या ५ नोटा, २० रुपये दराच्या ३ नोटा, १० रुपये दराच्या ४ नोटा पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केल्या आहेत.

विनम्र क्लबवर दोन ते तीन वेळा झाली कारवाई

कामोठेमध्ये चालू असलेल्या या विनम्र क्लबवर कामोठे पोलिस आणि नवी मुबई पोलिस पथकाने दोन ते तीन वेळा कारवाई केली असल्याची महिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news