जरांगे पाटलांची सरकारला मोठी अट, म्हणाले; ‘२ जानेवारीपर्यंतचा वेळ, पण…’ | पुढारी

जरांगे पाटलांची सरकारला मोठी अट, म्हणाले; ‘२ जानेवारीपर्यंतचा वेळ, पण...’

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसले होते. आज त्यांनी हे उपोषण मागे घेतल सरकारला २ जानेवारीपर्यंतचा वेळ दिलेला आहे.

मराठा आरक्षणाची मागणी लावून धरलेल्या जरांगे पाटील यांना सरकारचे शिष्टमंडळ आज भेटण्यासाठी गेले होते. या शिष्टमंडळात मंत्री उदय सामंत, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री संदिपान भुमरे यांचा समावेश होता. या शिष्टमंडळाने जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. या विनंतीनंतर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले.

शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेत जरांगे पाटील यांनी सरकारला २ जानेवारी पर्यंतचा वेळ दिलेला आहे. दिवाळी गोड व्हावी अशी इच्छा व्यक्त करत जरांगे यांनी हे उपोषण मागे घेतो असे जाहीर केले.

जरांगे पाटील उपोषण माघार घेताना म्हणाले की, सरकारला या आधीही वेळ दिलेला होता मात्र तरीही आरक्षणाबाबत हवा तो निर्णय आला नाही. आता दिवाळी तोंडावर आहे. सर्वांची दिवाळी गोड व्हावी त्यामुळे हे उपोषण मागे घेतो. सरकारला आता २ जानेवारीपर्यंतचा अल्टिमेटम असेल. पण सरकारला हा अल्टिमेटम शेवटचा असेल अशी अट देखील घातली.

Back to top button