Maratha Reservation Movement : मराठा आंदोलनाला हिंसक वळण; धाराशिवमध्ये उमरग्याला निघालेली बस पेटवली | पुढारी

Maratha Reservation Movement : मराठा आंदोलनाला हिंसक वळण; धाराशिवमध्ये उमरग्याला निघालेली बस पेटवली

उमरगा; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील तुरोरी येथे संतप्त जमावाने कर्नाटकची एसटी बस ही बस पेटवून दिल्याची घटना घडली. सदर बस कर्नाटकातून प्रवाशी घेऊन उमरगा येथे येत होती. सोमवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

राज्यात सर्वत्र मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी साखळी व आमरण उपोषण सुरू झाले आहेत. यातच लोकप्रतिनिधीला गाव बंदी करून जनतेने आपला रोष व्यक्त केला आहे. उमरगा तहसील कार्यालया समोर आमरण व साखळी उपोषण चालू आहे. त्याच्या समर्थनार्थ तालुक्यातील तुरोरी येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त जमावाने कर्नाटकहून उमरगाकडे येणारी बस (क्र. के.ए.३८एफ.१२०१) पेटवली. बसमधील वाहक आणि चालक जमावाला विनंत्या करीत होते, तरीपण कोणीही त्यांचे ऐकून घेतले नाही असे प्रत्यक्ष दर्शनी यांनी सांगितले. गावाजवळ बस थांबली असता संतप्त जमावांनी बस पेटवून दिली आहे.या घटनेची माहिती मिळताच उमरगा पोलीस निरीक्षक डी. बी.पालेकर,उमरगा आगार प्रमुख प्रसाद कुलकर्णी यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली. उमरगा नगर पालिकेच्या अग्निशमन गाडीने आग विजविण्याचा प्रयत्न केला मात्र अग्निशमनगाडी येण्याच्या आधी संपूर्ण बसगाडीने पेट घेतला होता.

Back to top button