Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? साेमवार २३, ऑक्‍टोबर २०२३ | पुढारी

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? साेमवार २३, ऑक्‍टोबर २०२३

राशिभविष्य

– ज्यो. मंगेश महाडिक

मेष ः राग हा केवळ काही काळापुरता केलेला वेडेपणा असतो; पण त्यामुळे तुम्ही संकटात सापडू शकता. जीवनसाथीचा मूड चांगला राहणार नाही.

वृषभ ः कुटुंबात वर्चस्ववादी भूमिका ठेवण्याचा स्वभाव बदलण्याची गरज. कुटुंबातील सदस्यांशी जवळीक साधून चढ-उतार शेअर करा.

मिथुन ः तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे; परंतु कामाच्या ताणामुळे त्रासून जाल. ज्यांची किंमत वाढतच जाणार आहे अशा वस्तू खरेदी करा.

कर्क ः दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाच्या सुटसुटीत वेळेमुळे विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. दुसर्‍यांवर प्रभाव पाडण्यासाठी मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका.

सिंह ः विजयोत्सव साजरा केल्याने अतीव आनंद मिळेल. जे लोक बर्‍याच काळापासून आर्थिक तंगीमधून जात आहेत, त्यांना धन प्राप्त होऊ शकते.

कन्या ः आपल्या संभाषणाबाबत कायम स्पष्ट असावे. रोजच्या वैवाहिक आयुष्यात आजचा दिवस मात्र थोडासा वेगळा असणार आहे.

तूळ ः खर्चावर नियंत्रण मिळवा. चैनीसाठी पैशांची उधळपट्टी होणार नाही, याची काळजी घ्या. जोडीदार अथवा भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील.

वृश्चिक ः वैवाहिक आयुष्यातील खडतर काळाला सामोरे जावे लागेल. संध्याकाळचा पूर्ण वेळ तुम्ही आपल्या जीवनसाथीला देऊ शकता.

धनु ः पैशाची बचत करण्याचा विचार करा. नवे नातेसंबंध दीर्घकाळ टिकणारे आणि चांगले लाभ मिळवून देणारे असतील.

मकर ः चार भिंतीबाहेरील खेळ आकर्षित करतील. ध्यानधारणा आणि योगाचा फायदा होईल. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत.

कुंभ ः खरेदीमध्ये उधळेपणा टाळा. तुमच्या जोडीदारामुळे तुम्हाला आज नुकसान सहन करावे लागेल. प्रेमापेक्षा अधिक काहीच नाही.

मीन ः आपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. तुमचे काही जुने आजार आज तुम्हाला चिंतित करू शकतात.

Back to top button