Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? शनिवार २१, ऑक्‍टोबर २०२३ | पुढारी

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? शनिवार २१, ऑक्‍टोबर २०२३

– ज्यो. मंगेश महाडिक

मेष ः प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतले तर त्याचा दुहेरी फायदा होईल, तुम्हाला चांगले वाटेल आणि तुम्ही अधिक आत्मविश्वास बाळगू शकाल.

वृषभ ः आयुष्याबद्दल उदार द़ृष्टिकोन तयार करा. आपल्या परिस्थितीबद्दल, जगण्याबद्दल तक्रारी करून उदास होण्यात काहीही अर्थ नाही.

मिथुन ः आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगले दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल.

कर्क ः तरुणाईचा सहभाग असणार्‍या उपक्रमात स्वत:ला गुंतविण्यासाठी चांगली वेळ आहे. प्रेमजीवनात काहीतरी खास मिळणार आहे.

सिंह ः तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर खूप फायदेशीर ठरेल. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल.

कन्या ः तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. दिवस उत्तम आहे. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढा.

तूळ ः यश हातातोंडाशी येण्याची शक्यता असताना ताकद कमी होत जाण्याची भावना निर्माण होईल. आर्थिक प्रश्नांमुळे विचार करण्याची ताकद नष्ट होईल.

वृश्चिक ः पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक कराल तर त्यातून धनप्राप्ती होईल. कुटुंबातील तणावांमुळे लक्ष विचलित होऊ देऊ नका.

धनु ः कोणत्याही प्रकारे ताकद कमी पडतेय असे नाही, तर इच्छाशक्ती कमी पडतेय. खर्‍या क्षमता ओळखा. महत्त्वाच्या कामामध्ये खंड पडू शकतो.

मकर ः स्थिती लवकरच सुधारेल. कुटुंबातील सदस्य सांगतील ते तुम्हाला काहीच मान्य होणार नाही; परंतु त्यांच्या अनुभवातून काहीतरी शिका.

कुंभ ः तुमच्या जीवनाला एक चांगला छान ताल येऊ द्या. त्यागाची, आत्मसर्मपणाची किंमत जाणून घ्या आणि हृदयात प्रेम बाळगून मार्गक्रमण करा.

मीन ः येणारा काळ हा खूप चांगला आहे, त्यासाठी उल्हसित राहा. त्यातूनच ऊर्जा मिळेल. संध्याकाळी तुम्हाला धनलाभ होऊ शकतो.

Back to top button