Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | गुरुवार १२, २०२३

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य

मेष : दिवसाची सुरुवात चांगली होईल, असे श्रीगणेश सांगतात. आत्मविश्वास कायम ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल. जवळच्या नातेवाईकाचीहीसाथ मिळेल. वैयक्तिक कामांमधील व्‍यस्‍ततेमुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष होण्‍याची शक्‍यता. ताण-तणावापासून लांब राहा.

वृषभ : आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी प्रयत्‍नशील असाल, असे श्रीगणेश सांगतात. तरुणांना काही कारणास्तव करिअरशी संबंधित योजना टाळाव्या लागतील. आज बहुतेक वेळ मार्केटिंग आणि बाहेरील कामे पूर्ण करण्यात जाईल.

मिथुन : श्रीगणेश सांगतात की, तुम्‍ही आज कामे योग्य पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. नातेसंबंध जपण्‍यासाठी तुमचे प्रयत्न महत्त्वाचे ठरतील. जुन्या मालमत्तेच्या खरेदी-विक्रीशी संबंधित महत्त्वाचा करार होण्याची शक्यता आहे.

कर्क : आज कोणतेही प्रलंबित काम पूर्ण करण्याची संधी निर्माण होईल, असे श्रीगणेश सांगतात. गृहिणी आणि नोकरदार महिला कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडतील. टीकाकारांकडे दुर्लक्ष करा. व्यापार व्यवस्थेत सुधारणा होईल.

सिंह : श्रीगणेश सांगतात की, आज ग्रहांची स्थिती अत्यंत समाधानकारक राहील. घरात जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीमुळे उत्साही वातावरण निर्माण होऊ शकते. कोणत्‍याही प्रकारची मध्‍यस्‍ती टाळा. तुमच्या समस्या सोडवण्यासाठी जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

कन्या : आज तुमच्या वैयक्तिक कामांमध्ये बाहेरील व्यक्तीला सहभागी करून घेऊ नका, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. कोणतेही नवे काम सुरु करण्यापूर्वी विचार करुनच निर्णय घ्‍या. कामात व्यत्यय येण्‍याची शक्‍यता.

तूळ : श्रीगणेश म्‍हणतात की, आज केवळ महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करा. एखाद्या शुभचिंतकाच्या मदतीने तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होईल. घाई आणि भावनेने घेतलेला निर्णय चुकीचा ठरू शकतो. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्या. ताण-तणावापासून दूर राहा.

वृश्चिक : आज काही अडचणी येतील; पण तुम्ही तुमच्या बुद्धी आणि हुशारीने समस्या सोडवाल, असे श्रीगणेश सांगतात. इतरांच्या मालमत्तेविषयी प्रश्‍नांमध्‍ये ढवळाढवळ करू नका. मुलांचा कोणताही हट्टीपणा तुम्हाला त्रास देऊ शकतो. दिवसाच्या सुरुवातीला काही व्यावसायिक समस्या आणि त्रास होतील.

धनु : आजचा दिवस तुमच्‍यासाठी आनंदी असेल. जवळचे मित्र आणि नातेवाईकांसोबत आनंदात वेळ जाईल. काही महत्त्वाचे काम केल्याने मन प्रसन्न राहील. संयुक्त कुटुंबात काही वाद होऊ शकतात. संयम आणि शहाणपणाने उपाय शोधण्याची हीच वेळ आहे. मानसिक तणाव आणि रक्तदाबाशी संबंधित समस्यांमुळे समस्या वाढू शकतात.

मकर : आज दुपारनंतर परिस्थिती चांगली राहील, असे श्रीगणेश सांगतात. अपेक्षेप्रमाणे निकाल लागल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. घाई आणि भावनेने घेतलेला निर्णय चुकीचा ठरू शकतो. काही स्वप्ने अपूर्ण राहिल्याने मन थोडे निराश होऊ शकते. आज व्यावसायिक कामे मंदावतील. महिलांना सांधेदुखीचा त्रास जाणवेल.

कुंभ : अनेक दिवसांपासून विस्कळीत असलेल्या गोष्टी आज पुन्हा व्यवस्थित होऊ लागतील, असे श्रीगणेश सांगतात. आज कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्‍या. भावंडांच्या नात्यात गोडवा ठेवा. आज प्रवास टाळा. व्यवसायासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.

मीन : श्रीगणेश सांगतात की, आज तुमची प्रतिभा वाढवण्याचा प्रयत्नांना तुम्हाला यश मिळेल. तुमचा आत्मविश्वास आणि कार्यक्षमता वाढू शकते. घरातील वातावरण एखाद्या गोष्टीमुळे खराब होऊ शकते. संयम ठेवा. आवश्यक कामांमध्ये काही अडथळे येऊ शकतात. पती-पत्नीचे नाते मधूर राहिल. काही काळापासून सुरू असलेल्या कोणत्याही शारीरिक समस्येपासून आज तुम्हाला आराम मिळू शकतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news