हर्बर रेल्वे मार्गावर पुन्हा पाच दिवसांचा वाहतुक ब्लॉक!; मध्य रेल्वेची माहिती | पुढारी

हर्बर रेल्वे मार्गावर पुन्हा पाच दिवसांचा वाहतुक ब्लॉक!; मध्य रेल्वेची माहिती

पनवेल :  पुढारी वृत्तसेवा : मध्य रेल्वेच्या हर्बर रेल्वे मार्गावर ५ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर पर्यत पुन्हा पाच दिवसांचा वाहतुक ब्लॉक घेणार येणार आहे. हा वाहतूकब्लॉक मध्यरात्री १ : ४५ ते ४ : ४५ पर्यत साडे तीन तसाच  घेण्यात येणार असल्याची माहिती मधेरेल्वेकडून देण्यात आली आहे. यामुळे बेलापूर आणि पनवेल स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा रद्द राहतील.

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसाठी अप आणि डाउन २  नवीन लाईन्सच्या बांधकामासाठी उपनगरीय यार्ड रीमॉडेलिंग कामासाठी मध्य रेल्वेने शनिवार व रविवारच्या सुट्टीत पनवेल येथे मोठा ब्लॉक चालवला.  त्यानंतर पनवेल EMU स्टेबलिंग साईडिंग येथे पोस्ट कमिशनिंग काम म्हणून, ५ ऑक्टोबर पासून ५ साइडिंग्जसाठी मध्यरात्री ब्लॉक चालवण्यात आला होता आणि उर्वरित ५ साइडिंगचे काम सुरू करण्यासाठी पुन्हा वाहतूक ब्लॉकची घोषणा केली आहे. या कालावधीत मध्यरात्री हे कामकाज करण्यात येणार आहे. यामुळे वाहतुकीच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे. तसेच वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ब्लॉक कालावधीत गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार ०१.१५ ते ४.४५ तास या तीन दिवसांसाठी बेलापूर आणि पनवेल स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा रद्द राहतील

प्रवासाचे मार्ग

● 5.10.2023 ते 08.10.2023 दरम्यान डाऊन हार्बर मार्गावरील पनवेलसाठी शेवटची लोकल CSMT 23.14 वाजता सुटेल आणि 00.34 वाजता पनवेलला पोहोचेल.

● 05.10.2023 ते 08.10.2023 पर्यंत डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील पनवेलसाठी शेवटची लोकल ठाणे 23.32 वाजता सुटेल आणि 00.24 वाजता पनवेलला पोहोचेल.

●  अप हार्बर मार्गावर पनवेलहून सुटणारी शेवटची लोकल ब्लॉक कालावधीत वेळापत्रकानुसार असेल.

●  05.10.2023 ते 08.10.2023 पर्यंत अप ट्रान्स-हार्बर मार्गावर पनवेलहून सुटणारी शेवटची लोकल 22.15 वाजता पनवेलहून सुटेल आणि 23.07 वाजता ठाण्याला पोहोचेल.

●  सीएसएमटीहून पनवेलसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार असेल.

● 05.10.2023 ते 08.10.2023 पर्यंत ठाण्याहून पनवेलसाठी ब्लॉक केल्यानंतर पहिली लोकल ट्रेन 06.20 वाजता ठाण्याहून सुटेल आणि 07.12 वाजता पनवेलला पोहोचेल.

●  05.10.2023 ते 08.10.2023 पर्यंत पनवेलहून अप हार्बर मार्गावरील ब्लॉकनंतर पहिली लोकल ट्रेन 05.10.2023 ते 08.10.2023 पर्यंत पनवेलहून 05.17 वाजता सुटेल आणि 06.36 वाजता CSMT ला पोहोचेल.

●  ब्लॉकनंतर पनवेलहून अप ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाण्याच्या दिशेने 05.10.2023 ते 08.10.2023 पर्यंत पहिली लोकल ट्रेन 05.44 वाजता पनवेलहून सुटेल आणि 06.38 वाजता ठाण्याला पोहोचेल.

Back to top button