Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | गुरूवार २१, २०२३ | पुढारी

Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | गुरूवार २१, २०२३

चिराग दारूवाला

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
 

राशिभविष्य

मेष : श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही विविध कामांमध्ये व्यस्त राहाल. योग्‍य मोबदला मिळाल्याने समाधान मिळेल. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे निराशाजनक असू शकते. व्यापारात स्थान बदलण्याची शक्यता. घरात पाहुण्यांच्‍या आगमनामुळे उत्साही वातावरण राहिल.

वृषभ

वृषभ : आज महत्त्‍वाचे काम पूर्ण केल्‍याने समाधान लाभेल. चिंता सोडून स्‍वत:च्‍या कृतीवर लक्ष केंद्रीत केल्‍यास यश मिळेल, असे श्रीगणेश म्‍हणतात. घरातील वडीलधाऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करा. व्यापारातील प्रलंबित काम पूर्ण होण्याची शक्यता.

राशिभविष्य

मिथुन : आज इतरांना मदत कराल. समाजात तुमचा सन्मान होईल. आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाल, असे श्रीगणेश सांगतात. जमीन-मालमत्ता आणि वाहनाबाबत काही समस्या निर्माण होऊ शकतात. आर्थिक अडचणी दूर होण्याची शक्यता आहे. पती-पत्नीचे नाते मधुर राहील. डोकेदुखी आणि मानसिक थकवा जाणवू शकतो.

कर्क

कर्क : आज तुमच्‍यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. घरामध्ये काहीतरी नवीन खरेदी शक्य आहे, असे श्रीगणेश सांगतात. संततीच्या यशामुळे आनंद मिळेल. जवळच्या नातेवाईक किंवा मित्राशी मतभेद होण्‍याची शक्‍यता. व्यवसाय किंवा कार्यालयात काही बदल करावे लागतील.

सिंह

सिंह : आज तरुणाईची कोंडी दूर होईल. मोठा निर्णय घेण्यास सक्षम व्‍हाल. मुलाखतीमध्‍ये यश. तुमचे धारदार शब्द एखाद्याला निराश करू शकतात याची जाणीव ठेवा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करू नका. व्यावसायिक उपक्रमांना बळ मिळेल. उष्णतेशी संबंधित आजारांमुळे त्रास होण्‍याची शक्‍यता.

कन्या

कन्या : आज शिक्षणाशी संबंधित अडथळा दूर होईल. तुम्हाला तुमच्या मेहनतीनुसार योग्य फळही मिळेल. तुमच्या नकारात्मक विचारांना तुमच्या व्यवसायावर वर्चस्व गाजवू देऊ नका, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. घर आणि व्यवसायात सुसंवाद राखल्यास सर्व परिस्थिती अनुकूल होईल.

तुळ

तूळ : आजचे राशिभविष्य, अनेक दिवसांपासून व्यस्ततेमुळे तुम्हाला आज थकवा जाणवेल. त्यामुळे आजचा दिवस शारीरिक आणि मानसिक विश्रांती घ्‍या, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी याचा विचार करणे गरजेचे आहे. घरातील ज्‍येष्‍ठांकडे दुर्लक्ष करू नका. पती-पत्‍नीमधील संवाद वाढेल.

राशिभविष्य

वृश्चिक : आजचे राशिभविष्य, कोणत्याही धार्मिक कार्यातील व्यक्तींशी भेटल्‍यामुळे तुमच्‍या दृष्टिकोनात आश्चर्यकारक बदल घडतील असे गणेश सांगतात. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. जोडीदारासोबत चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. बदलत्या वातावरणामुळे ताप आणि खोकला याचा त्रास होवू शकतो.

राशिभविष्य

धनु : अनुकूल ग्रहमानामुळे तुमची कार्यक्षमता वाढत आहे. आज जवळच्या नातेवाईकांना भेटून आनंद होईल. प्रवास घडेल. खर्च वाढण्‍याची शक्‍यता. व्यवसायात कोणतेही निर्णय घेऊ नका. तुमच्या कृतीत तुमच्या जोडीदाराचा सल्ला अवश्य घ्या, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.

राशिभविष्य

मकर : आजचा दिवस मानसिकदृष्ट्या खूप समाधान देणारा असल्याचे श्रीगणेश सांगतात. शांतपणे काम करण्याचा प्रयत्न करा. जास्त चर्चा टाळा. कुटुंबात जोडीदाराचे पूर्ण सहकार्य तुम्हाला दिलासा देऊ शकेल. घसा खवखवणे किंवा संसर्ग होऊ शकतो.

कुंभ

कुंभ : जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोनामुळे आज तुमची अनेक कामे व्यवस्थित सुरू होतील, असे श्रीगणेश सांगतात. घर-कुटुंबाच्या गरजांकडे लक्ष द्‍याल. जमीन व मालमत्तेबाबत भावांसोबतचे वाद कोणाच्या तरी मध्यस्थीने मिटतील अन्यथा वाद वाढू शकतो. कौटुंबिक व्यवसायाशी संबंधित कामांकडे अधिक लक्ष द्या.

मीन

मीन : तरुणांना त्यांच्या कामात यश मिळाल्याने दिलासा मिळेल, असे श्रीगणेश सांगतात. सर्जनशील कामांमध्ये रस वाढेल. मानसिक आनंदासाठी धार्मिक स्थळाला भेट देण्‍याचे नियोजन केल्‍यास तुम्हाला पुन्हा उत्साही वाटेल. जास्त कामामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही.

Back to top button