Drunk Baby : दीड महिन्यांच्या बाळाला पाजले अल्कोहोल मिश्रीत दूध; रुग्णालयात दाखल केल्यानंतर घटना उघडकीस | पुढारी

Drunk Baby : दीड महिन्यांच्या बाळाला पाजले अल्कोहोल मिश्रीत दूध; रुग्णालयात दाखल केल्यानंतर घटना उघडकीस

पुढारी ऑनलाईन डेस्क : बऱ्याचदा लहान मुलांबाबतीत अनेक गंभीर घटना समोर घडल्याचे पहायला मिळत असते. सध्या एक अशी घटना समोर आली आहे ज्यामध्ये एका आईची बेपर्वाई समोर आली आहे. दीड महिन्याचे बाळ रडत होते म्हणून या घटनेतील आईने बाळाला अल्कोहोल मिश्रीत दूध (alcohol-mixed milk) पाजल्याची घटना उघडकीस आली आहे. (Drunk Baby)

अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे एका धक्कादायक घटना समोर आली आहे. होनेस्टी दे ला टोरे असे या महिलेचे नाव आहे. ही घटना समजल्यानंतर स्थानिक काउंटी शेरीफच्या कार्यालयाने घटनेतील संबंधित ३७ वर्षीय महिलेवर कारवाई केली. या आईने आपल्या दीड महिन्यांच्या बाळाच्या दुधाच्या बाटलीत अल्कोहोल (alcohol-mixed milk) भरून मुलाला रडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला आहे. नशेत असलेल्या बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.  या महिलेच्या बेपर्वाईमुळे बाळाचा जीव धोक्यात आला आहे. (Drunk Baby)

5 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 12:45 च्या सुमारास लॉस एंजेलिसपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या रियाल्टो येथून एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन या घटनेची माहिती दिली. या व्यक्तीने दिलेल्या माहिती नंतर उघडकीस आली. संबंधित महिलेने याबाबतच्या आरोपानंतर या कृत्याबाबत माहिती दिली. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिने बाळाच्या सततच्या रडण्यामुळे बाळाच्या बाटलीत अल्कोहोल टाकून शांत करण्याचा प्रयत्न केला. यामुळे लहान बाळाला त्रास होऊ लागला, त्यामुळे या चिमुरड्या मुलाला रुग्णालयात दाखल केले. या लहान बाळावर सध्या उपचार असल्याची माहिती आहे. मात्र बाळाची प्रकृतीबाबत कोणतीही माहिती अद्याप प्राप्त नाही. या घटनेतील बाळाच्या आईला वेस्ट व्हॅली डिटेन्शन सेंटरमधील कोठडीत ठेवण्यात आले आहे.

 

Back to top button